"सॉरी फॅमिली, मी तुमचा आधार नाही बनू शकलो" इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून युवकाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:34 IST2026-01-01T13:30:10+5:302026-01-01T13:34:45+5:30
Yavatmal : युवकाने स्वतःच्या मृत्यूची इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुसद तालुक्यात हुडी (बुद्रुक) येथे सोमवारी, २९ डिसेंबर रोजी दुपारी एक ते दीड वाजताचे दरम्यान घडली.

"Sorry family, I couldn't be your support" young man ends life by posting on Instagram
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद (यवतमाळ) : युवकाने स्वतःच्या मृत्यूची इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुसद तालुक्यात हुडी (बुद्रुक) येथे सोमवारी, २९ डिसेंबर रोजी दुपारी एक ते दीड वाजताचे दरम्यान घडली. आत्महत्येपूर्वी युवकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा फोटो लावून त्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आणि मृत्यूची वेळही लिहिली होती. शिवराज रामराव दोडके (वय १८)) असे मृताचे नाव आहे.
आत्महत्येची घटना लक्षात येताच आजीने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. पोलिस पाटील दिनेश हरणे यांनी माहिती पुसद ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुसद शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. शिवराजचे आई-वडील पुणे येथे कामासाठी गेले असून, तो आजीबरोबर राहात होता. त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी ठेवली. इन्स्टाग्राम आयडीवर ठेवण्यात आलेली पोस्ट पाहिल्यानंतर ही आत्महत्या पोस्ट अपलोडनंतर केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
हीच ती पोस्ट
'सॉरी फॅमिली, मी तुमचा आधार नाही बनू शकलो, मिस यू किंग. शिवराज दोडके याचे आज दुपारी १ वाजता निधन झाले आहे. तर अंत्यविधी उद्या सकाळी १२ वाजून ३५ मिनिटाला आहे. मुक्काम पोस्ट हुडी (बु.) तालुका पुसद, भावपूर्ण श्रद्धांजली शिवराज दोडके' अशा प्रकारची पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर ठेवली होती.