शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने न्याय प्रक्रियेला गती द्यावी, मराठा आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या तरुणांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत व एका सदस्याला नोकरी द्यावी, ‘सारथी’ संस्थेला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज सुरू करावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवून बांधकामाला गती द्यावी, ........

ठळक मुद्देसमन्वय समितीचे शिष्टमंडळ प्रशासनाला भेटले : सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मराठा समाजाच्या प्रमुख आणि महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, अपवाद वगळता कधी बैठक घेण्यात आलेली नाही, असे नमूद करून मराठा समाजाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने न्याय प्रक्रियेला गती द्यावी, मराठा आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या तरुणांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत व एका सदस्याला नोकरी द्यावी, ‘सारथी’ संस्थेला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज सुरू करावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवून बांधकामाला गती द्यावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजनेची अंमलबजावणी करावी, आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी न घेता न्यायालय पूर्णपणे सुरू होईल तेव्हा प्रत्यक्ष घेण्यात यावी, आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करणाºया वकीलांना सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत सहभागी करून घ्यावे आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.समितीच्यावतीने शिवक्रांती सेना महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष गजानन वानखडे, शिक्षण सेना जिल्हाध्यक्ष रवींद्र कोल्हे, संजू भितकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशीष खडसे, वाहनचालक मालक संघटनेचे राजू बोईनवार, अपंग सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय ढोरे, बाभूळगाव तालुका अध्यक्ष श्रीकांत महल्ले आदींच्या स्वाक्षºयानिशी निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण