शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

दहावी अनुत्तीर्णांसाठी कौशल्य सेतू

By admin | Updated: October 9, 2016 00:14 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेतर्फे ‘कौशल्य सेतू २०१६’

यवतमाळ : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेतर्फे ‘कौशल्य सेतू २०१६’ प्रशिक्षणाचे उद्घाटन अभ्यंकर कन्याशाळा येथे झाले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यंकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणीता काटेवाले होत्या. विस्तार अधिकारी राजू मडावी, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पंचभाई, शिक्षक परिषद अध्यक्ष राजेश मदने, विमाशीचे विजय खरोडे उपस्थित होते. तज्ज्ञ समुपदेशक किशोर बनारसे व प्रवीण मलकापुरे यांनी पॉवर प्वार्इंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वात शालेय शिक्षण विभागाने पहिल्यांदाच महाराष्ट्रात दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य सेतु कार्यक्रम अमलात आणला आहे. जुलैमधील फेरपरीक्षेतील तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन विविध उद्योगधंद्यांमध्ये त्यांना रोजगाराची संधी कौशल्य सेतुमुळे मिळणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत दहावीच्या विषय शिक्षकांना आणि वर्गशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. दहावीत अनुत्तीर्ण होण्याची विविध कारणे असतात. परंतु संधी न मिळाल्यास शिक्षणाची दारे अशा विद्यार्थ्यांसाठी बंद होऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. या सर्व बाबीचा विचार करून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने कौशल्य सेतु सुरू केला आहे. कौशल्य सेतुकरिता पात्र विद्यार्थ्यांचे १० आॅक्टोबरपर्यंत १०० टक्के रजिस्ट्रेशन पूर्ण करून संबंधित डेटा एनवायसीएसकडे हस्तांरित करण्यात यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक, समुपदेशक संघटनेचे अध्यक्ष किशोर बनारसे यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)