पोफाळी ठाण्यात प्रेमीयुगुलाचे शुभमंगल

By Admin | Updated: August 22, 2015 02:37 IST2015-08-22T02:37:40+5:302015-08-22T02:37:40+5:30

प्रेमविवाहाला विरोध होत असल्याचे पाहून एका प्रेमीयुगुलाने चक्क पोफाळी पोलीस ठाणे गाठले.

Shubhamangal of Premayugala in Pavalai Thane | पोफाळी ठाण्यात प्रेमीयुगुलाचे शुभमंगल

पोफाळी ठाण्यात प्रेमीयुगुलाचे शुभमंगल

ठाणेदाराचा पुढाकार : गौळचा तरुण आणि मोहदीची तरुणी
पोफाळी : प्रेमविवाहाला विरोध होत असल्याचे पाहून एका प्रेमीयुगुलाने चक्क पोफाळी पोलीस ठाणे गाठले. ठाणेदाराने पुढाकार घेत या प्रेमीजीवाचे शुभमंगल लावून दिले. पोलिसांच्या साक्षीने दोन प्रेमीजीव एकत्र आले.
तालुक्यातील गौळ खुर्द येथील महाविद्यालयीन तरुण दीपक पवार याचे महागाव तालुक्यातील मोहदी येथील अश्विनी सोबत प्रेमसंबंध जुळले. आयुष्यभर साथसंगत देण्याच्या आणाभाका घेतल्या. पुसद येथे शिक्षण घेत असताना हे दोघेही प्रेमात आकंठ बुडाले. परंतु घरचे लग्नाला सहजासहजी परवानगी देणार नाही याची या दोघांनाही जाणीव होती. तरीही आई-वडिलांशी चर्चा केली. अश्विनीच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. मात्र लग्न तर करायचेच होते. शेवटी गुरुवारी या दोघांनीही पोफाळी पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांना सर्व हकीकत कथन केली. ठाणेदारांनी या दोघांच्या जवळच्या मंडळींना ठाण्यात बोलावून घेतले. ठाणेदारांनी स्वत: पुढाकार घेतला व कन्यादान करून मिलन घडवून आणले. (वार्ताहर)

Web Title: Shubhamangal of Premayugala in Pavalai Thane