शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शरद पवार यांनी शिष्टाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 5:00 AM

२३ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. तरी महामंडळाचे दररोज सुमारे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसत आहे. मार्च देय एप्रिल २०२० चे २५ टक्के आणि मे देय जूनचे ५० टक्के वेतन कमी देण्यात आले. जून देय जुलैचा पगार अजूनही झालेला नाही.

ठळक मुद्देकामगार संघटना । शासनाकडून दरमहा ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळावी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. मार्च महिन्यापासून त्यांच्या पगाराचे वांदे सुरू आहेत. जून महिन्याचा एक पैसाही मिळाला नाही. आपण यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, अशी विनंती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना केली आहे. शासनाकडून महामंडळाला दरमहा ४०० कोटींची आर्थिक मदत मिळावी यासाठी सहकार्य करावे, असे या पत्रात म्हटले आहे.२३ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. तरी महामंडळाचे दररोज सुमारे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसत आहे. मार्च देय एप्रिल २०२० चे २५ टक्के आणि मे देय जूनचे ५० टक्के वेतन कमी देण्यात आले. जून देय जुलैचा पगार अजूनही झालेला नाही. या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कौटुंबिक गरजा भागविणेही कठीण होवून बसले आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली होती. शासनाने महामंडळाला आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली. परंतु संपूर्ण जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार होण्यासाठी एक पैसाही देण्यात आलेला नाही. पगाराअभावी अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वसामान्य लोकांची लालपरी टिकावी, एसटी महामंडळ आर्थिक संकटातून बाहेर निघावे यासाठी खासदार शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे संघटनेने म्हटले आहे. महामंडळाला शासनाकडून दरमहा ४०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यातून कामगारांचे वेतन, एसटी चालविण्यासाठी लागणारा खर्च निघू शकेल. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचे जनरल सेके्रटरी हनुमंत ताटे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात खासदार शरद पवार हे कुठली भूमिका घेतात याकडे एसटीच्या राज्यभरातील एक लाखांवर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.शासनाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे कामगारांना वेतन देणे शक्य होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. मात्र शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन कालावधीत पूर्ण वेतन देण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठीही अशी पूर्ण वेतनाची व्यवस्था व्हावी, असे संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :state transportएसटी