शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

राष्ट्रीय महामार्गालगत स्पेंट वॉशचा सांडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:28 AM

नागरिकांचे आरोग्य धोक्यात फोटो ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : राष्ट्रीय महामार्गालगत ई-क्लास आणि ‘एनएएच’च्या हद्दीत दिवसाढवळ्या पर्यावरणाला हानिकारक स्पेंट वॉश ...

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

फोटो

ज्ञानेश्वर ठाकरे

महागाव : राष्ट्रीय महामार्गालगत ई-क्लास आणि ‘एनएएच’च्या हद्दीत दिवसाढवळ्या पर्यावरणाला हानिकारक स्पेंट वॉश सांडवा वाहत आहे. एका डिस्टलरी कारखान्याकडून अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा सांडवा वाहत आहे. मात्र, या संदर्भात पर्यावरण विभागाला कोणतेही सोयरसुतक नाही.

डिस्टलरी कारखान्याने दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ईटीपीची निर्मिती करणे अनिवार्य आहे. परंतु तालुक्यातील गुंज येथील एक प्लांट मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दरवर्षी भर पावसाळ्यात हे दूषित पाणी जागा मिळेल तेथे टाकले जात आहे. हेच दूषित पाणी नदी, नाल्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नदी व नाल्यातील जीवजंतुसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. हे स्पेंट वॉश गुराढोरांच्या पिण्यात गेल्यास दगावण्याची शक्यता बळावली आहे.

सबंधित डिस्टलरी कारखान्यावर पर्यावरण विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी जनभावना आहे. पर्यावरणाला घातक असलेले द्रव्य स्वरूपातील स्पेंट वॉश शासकीय ई-क्लास आणि राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत टँकरच्या साहाय्याने टाकले जाते. गुंज परिसरात असलेल्या कारखान्यात उसापासून तयार होणाऱ्या मोल्यासिसपासून कच्या इथेनॉलची निर्मिती केली जाते. त्यापासून मोठ्या प्रमाणात अल्कोहोल व सॅनिटायझर तयार केले जाते. हे सर्व ज्वालाग्राही रसायन विविध केमिकल वापरून बनवले जाते. या मोल्यासीसचे रूपांतरण द्रव्य स्वरूपातील स्पेंट वॉशमध्ये होते.

बॉक्स

हा खेळ आणखी किती दिवस चालणार

सध्या खरीप हंगाम सुरू असून, लागवडीची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात मजूर काम करीत आहेत. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे मजुरांना काम करणेही कठीण झाले आहे. डिस्टलरीचा हा अतिरेक आणखी किती दिवस चालेल व किती लोकांचे बळी घेणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कोट्या संदर्भात सखोल माहिती घेऊन तक्रार असलेल्या ठिकाणी स्पेंट वॉश टाकणे त्वरित बंद करू. आम्ही मागणीनुसार शेतकऱ्यांना खत म्हणून त्यांची परवानगी घेऊन स्पेंट वॉश टाकत असतो. परंतु महामार्गालगत टाकण्यात आल्याबद्दल माहिती नाही.

===Photopath===

190621\img_20210619_130059.jpg

===Caption===

डिक्शनरी प्लॅटचे दूषित पाणी महामार्गावर टाकताना चा क्षण