चोरीस गेलेले सात तोळे सोने घर मालकाच्या स्वाधीन

By Admin | Updated: July 1, 2016 02:32 IST2016-07-01T02:32:57+5:302016-07-01T02:32:57+5:30

शहरातील दुर्गेश नारायण पाम्पट्टीवार यांच्या घरून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले होते.

The seven Tola gold stolen gold is owned by the owner of the house | चोरीस गेलेले सात तोळे सोने घर मालकाच्या स्वाधीन

चोरीस गेलेले सात तोळे सोने घर मालकाच्या स्वाधीन

वणी : शहरातील दुर्गेश नारायण पाम्पट्टीवार यांच्या घरून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले होते. वणी पोलिसांनी या घटनेचा तपास करून चोरट्यांना जेरबंद केले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रीया पूर्ण करून पोलिसांनी चोरीतील सात तोळ्यांचे दागिने गुरूवारी दुर्गेश पाम्पट्टीवार यांना परत केले.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अज्ञात चोरट्यांनी दुर्गेश पाम्पट्टीवार यांच्या घरातून सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
वणीचे ठाणेदार मुकूंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरीचा छडा लावून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. गुरूवारी सर्व कायदेशिर सोपस्कार पार पाडून उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गिरी, ठाणेदार मुकंूद कुळकर्णी यांनी पाम्पट्टीवार यांना सदर दागिने परत केले. (प्रतिनिधी)

Web Title: The seven Tola gold stolen gold is owned by the owner of the house