शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये आणखी सात लाखांची रोकड जप्त

By admin | Updated: November 12, 2016 01:37 IST

येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नाक्यांवर वाहनांची तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे.

महसूल प्रशासनाची कारवाई : नगरपरिषद निवडणुकीमुळे वाहनांची नाक्यावर तपासणी दिग्रस : येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नाक्यांवर वाहनांची तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे. त्यात सात लाख २३ हजार रुपये जप्त करण्यात आले. गेल्या दोन दिवसातील हा आकडा सुमारे ४० लाखांवर पोहोचला आहे.उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर बागडे, सहायक अधिकारी शेषराव टाले, पोलीस पथकातील रणजित गायकवाड, अश्विन इंगळे यांनी ही कारवाई केली. दारव्हा मार्गावरील नाक्यावर विनायक रघुनाथ कुलकर्णी यांच्या वाहनात (एम.एच.३१-टीसी-५६५) तपासणीदरम्यान सात लाख २३ हजारांची रोकड आढळली. त्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ती जप्त करण्यात आली. गुरुवारी चार वाहनातून ३२ लाख १८ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. या कारवाईने रोकड वाहतूकदारात दहशत निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अन्य सात नगरपरिषदांमध्ये तपासणीचा मुहूर्त केव्हा ?दिग्रसच्या महसूल प्रशासनाने गेली दोन दिवस भरदिवसा वाहनांची अचानक तपासणी केल्याने सुमारे ४० लाखांंची रोकड हाती लागली. दिग्रसचे महसूल प्रशासन निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रस्त्यावर उतरले असताना अन्य सात नगरपरिषदांमधील महसूल प्रशासन ढिम्म का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेथील महसूल प्रशासनाला वाहन तपासणीचा मुहूर्त केव्हा सापडणार असा प्रश्न विचारला जात आहे. दिग्रसचा अनुभव पाहता सर्वच नगरपरिषद क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोकडची वाहतूक वाहनांमधून केली जात असावी. मात्र अद्याप तेथे कारवाई सुरू न झाल्याने जणू नोटांच्या या वाहतुकीला मुभा मिळाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. त्यातही मोठी ‘उलाढाल’ होत आहे. मात्र तालुका महसूल प्रशासन अद्याप कार्यालयातच गुंतून असल्याने या ‘उलाढाली’चा पर्दाफाश होऊ शकलेला नाही.