शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये अपघाताची मालिका

By admin | Updated: March 12, 2015 02:23 IST

मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांचे आठवडाभरात दोन बळी ठरले.

नेर : मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांचे आठवडाभरात दोन बळी ठरले. शिवाय सहा जनावरांनाही या वाहनांनी चिरडले. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. पोलीस विभागाकडून मात्र भरधाव धावणाऱ्या वाहनांवर थोडेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. केवळ शहरातच वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी असल्यागत ते वागत आहेत. तालुक्याच्या लासिना येथे अंगणात उभ्या असलेल्या अभय सोनोने (२५) या युवकाला कंटेनरने चिरडले. या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव नियंत्रणात येत नाही तोच टेंबी येथील दुचाकीवर स्वार माया टोम्पे हिचा कंटेनरच्या धडकेत बळी गेला. अपघातानंतर वाहनधारक पसार होत असल्याने बहुतांश प्रकरणात अपघातग्रस्त वाहन सापडत नसल्याने भरधाव वाहनचालकांची हिम्मत वाढली आहे. लासिना येथे घडलेल्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रकचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी चालकाने कुठेही न थांबता वाहनाचा वेग वाढविला, याप्रकारात सहा जनावरांचा बळी गेला. अखेर ट्रक नेर येथे पकडून चालकाला ताब्यात घेण्यात आले. टेंबी येथे महिलेला धडक देऊन पसार झालेला ट्रक पकडण्यात नागरिक आणि पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ नागरिकांच्या जीवावर उठली आहे. नेर शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शिपायांची नियुक्ती आहे. मात्र ते आपले कार्यक्षेत्र काही भागापूरतेच मर्यादित ठेवत आहेत. वर्दळीच्या परिसरात तेवढी त्यांची कामगिरी दिसते. इतर ठिकाणी मात्र वाहतुकीवर नियंत्रण नाही. त्यामुळे शहरात लहानमोठे अपघात ही बाब नित्याची झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थिनी सुसाट वाहनाची बळी ठरली होती. हा प्रकार थांबविणे पोलीस विभागासाठी आव्हान ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)