शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयं साहाय्यता समूहाचा महिलांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:14 IST

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत येत्या १६ फेब्रुवारीला पांढरकवडा येथे स्वयंम् साहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांची उपस्थिती : तीन लाख महिलांच्या उपस्थितीचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत येत्या १६ फेब्रुवारीला पांढरकवडा येथे स्वयंम् साहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.स्थानिक रामदेवबाबा ले-आऊटच्या भव्य प्रांगणात शनिवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ग्रामविकास व महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, खासदार भावना गवळी, खा.राजीव सातव, जि.प.च्या अध्यक्षा माधुरी आडे, आ.राजू तोडसाम, आ.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.राजेंद्र नजरधने, आ.श्रीकांत देशपांडे, आ.ख्वाजा बेग, आ.निलय नाईक, आ.मनोहर नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात स्वयंम् सहाय्यता समूहाच्या महिलांचा सत्कार व निधी वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या नेतृत्वात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हा व जिल्ह्याबाहेरील दोन हजार १०० पोलीस शिपाई व ४०० पोलीस अधिकारी बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत. यासोबतच पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक हे देखील कार्यक्रमस्थळी उपस्थित असतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी