सलग दुसऱ्या दिवशी घेतला कोरोनाने वृद्धाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST2021-02-08T05:00:00+5:302021-02-08T05:00:17+5:30

रविवारी दगावलेला ६६ वर्षीय वृद्ध पुरुष हा यवतमाळ शहरातील रहिवासी होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, रविवारी एकूण २०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर १५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४५८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ७०६ झाली आहे. दिवसभरात ३७ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १३ हजार ८१६ आहे.

For the second day in a row, Corona killed the old man | सलग दुसऱ्या दिवशी घेतला कोरोनाने वृद्धाचा बळी

सलग दुसऱ्या दिवशी घेतला कोरोनाने वृद्धाचा बळी

ठळक मुद्दे४२ नवे पाॅझिटिव्ह : ३७ जण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा कहर अजूनही थांबायला तयार नाही. शनिवारी तिघांचा बळी घेतल्यानंतर रविवारी आणखी एका वृद्धाचा कोरोना मृत्यू झाला, तर दिवसभरात ३७ जणांनी कोरोनावर मात केलेली असतानाच तब्बल ४२ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे.
रविवारी दगावलेला ६६ वर्षीय वृद्ध पुरुष हा यवतमाळ शहरातील रहिवासी होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, रविवारी एकूण २०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर १५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४५८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ७०६ झाली आहे. दिवसभरात ३७ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १३ हजार ८१६ आहे. जिल्ह्यात एकूण ४३२ जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने घेतली आहे. 
सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख ४५ हजार १६७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून, यापैकी १ लाख ४४ हजार ७६७ प्राप्त, तर ४०० अप्राप्त आहेत तसेच १ लाख ३० हजार ६१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे.

४५८ ॲक्टिव्ह रुग्ण
राज्यात कोरोना नियंत्रणात दिसत असला तरी जिल्ह्यात मात्र कायम आहे. अजूनही रुग्णालयात ४५८ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

 

Web Title: For the second day in a row, Corona killed the old man