शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

चार केबल व्यावसायिकांचे पॉर्इंट सील

By admin | Updated: March 18, 2016 02:45 IST

कमी केबल जोडण्या दाखवून लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरातील चार व्यावसायिकांवर

कोट्यवधीची थकबाकी : महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाईयवतमाळ : कमी केबल जोडण्या दाखवून लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरातील चार व्यावसायिकांवर महसूल विभागाने गुरुवारी कारवाई करून अनधिकृत पॉइंट सील केले आहे. यामध्ये एम.ए. रहमान यांच्याकडे ५८ लाख ६५ हजार रुपये, अनंता गावंडे यांच्याकडे ३६ लाख ६५ हजार रुपये, प्रवीण दाणी यांच्याकडे १८ लाख २६ हजार रुपये व निखिल इसासरे यांच्याकडे २२ लाख ६० हजार रुपये शासनाची थकबाकी आहे. त्यांना नोटीस पाठवूनही त्यांनी पैसे भारले नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. शासन परिपत्रकानुसार दोन दिवस विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. यापुढेसुद्धा अशाप्रकारची कारवाई सुरूच राहणार असून अद्याप ज्या केबल व्यावसायिकांनी शासनाची थकबाकी भरली नाही. त्यांचाही क्रमांक निश्चितपणे लागणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आजच्या कारवाईनंतरही या व्यावसायिकांनी पैसे न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तेवरही टाच येऊ शकते. भविष्यात त्यांची मालमत्ता जप्त होऊ शकते. शासनाने सेटटॉप बॉक्स १ जानेवारी २०१६ पासून अनिवार्य केला होता. परंतु यामध्ये असलेल्या काही अडचणी लक्षात घेता ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ देण्यात आली आहे. एकदा सेटटॉप बॉक्स अनिवार्य झाला तर मात्र करमणूक कर चोरीचे प्रकरणच संपुष्टात येईल. सध्या क्रिकेटच्या २०-२० प्रकारातील वर्ल्ड कप २०१६ सुरू आहे. अशातच महसूल विभागाच्या या कारवाईने शहरातील अनेक भागातील टीव्ही संच बंद पडल. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. क्रिकेटच्या अनेक चाहत्यांनी तर थेट तहसील कार्यालय गाठून याबाबतची माहिती घेतली. परंतु सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांनीसुद्धा या कारवाईची प्रशंसाच केली. तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार बोरकर, करमणूक कर निरिक्षक गुल्हाने, देवरे यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी बंदोबस्तही उपलब्ध करून दिला होता. यामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक ताटे, पोलीस उपनिरिक्षक निर्मळ, मांढरे यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)