शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा 28 जूनला वाजणार पण विद्यार्थ्याविनाच शाळा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

महाराष्ट्रात १५ जूनपासून सत्र सुरू झाले. तर जिल्ह्यात २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार सुरुवातीला केवळ शिक्षकांना शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन संस्थेमार्फत दररोज ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शिक्षकांत संभ्रमसंचालकांच्या पत्रानंतर जिल्हा परिषदेच्या पत्राची प्रतीक्षा, जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  विदर्भात व यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राप्रमाणेच जिल्ह्यातही सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू केले जाणार आहे. त्यामुळे २८ जून रोजी शाळा सुरू झाल्या तरी शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट परतण्याची सध्याच शक्यता नाही. केवळ शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश आहेत.महाराष्ट्रात १५ जूनपासून सत्र सुरू झाले. तर जिल्ह्यात २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार सुरुवातीला केवळ शिक्षकांना शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन संस्थेमार्फत दररोज ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील शाळा अद्याप सुरू झालेल्या नसल्या तरी ही अभ्यासमाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. मात्र मोबाईल आणि नेटवर्कअभावी ग्रामीण भागात यंदाही ऑनलाईन शिक्षणात खंडच पडण्याची शक्यता आहे. 

संचालकांचे पत्र म्हणते...पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. दहावी व बारावीच्या शिक्षकांना मात्र शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राचार्य यांची शंभर टक्के उपस्थिती असेल. दहावी, बारावीच्या निकालासाठी शंभर टक्के उपस्थिती आवश्यक आहे. 

जि.प.च्या पत्राचे काय?जिल्ह्यातील शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र शिक्षकांच्या उपस्थितीचे निकष काय असतील याबाबत जिल्हा परिषद सोमवारी पत्र जारी करणार आहे. तूर्त शिक्षण संचालकांच्या पत्रानुसारच उपस्थतीबाबत शिक्षकांना सूचना आहे. नववी व अकरावीपर्यंत ५० टक्के तर दहावी, बारावीसाठी १०० टक्के उपस्थिती राहील.

शिक्षक आणि विद्यार्थी शाळेसाठी उत्सूक

जेथे कोरोना रुग्ण नाही अशा गावात विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यास हरकत नाही. शिक्षकांनाही १०० टक्के उपस्थिती आवश्यक करावी. मात्र त्यासोबतच शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्न केले जावे.- संदीप कोल्हे, शिक्षक, सुकळी ता.कळंब

शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्सुकता लागलेली आहे. पण पूर्ण लसीकरण होईपर्यंत पालकांची मानसिक तयारी दिसत नाही. शिक्षकांना शाळेत शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात यावी. शिक्षक स्वत: शाळेत जाण्यास तयार आहे. - किशोर बनारसे, शिक्षक, कवठाबाजार आर्णी

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या