शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी वाचवा, टँकर सज्ज ठेवा

By admin | Updated: October 4, 2015 00:36 IST

तहान लागण्यापूर्वीच... : उन्हाळ्यातील टंचाईसाठी आराखडा तयार

तहान लागण्यापूर्वीच... : उन्हाळ्यातील टंचाईसाठी आराखडा तयारयवतमाळ : दरवर्षी उन्हाळ्यात चटके जिवघेणे ठरू लागल्यानंतर टंचाई निवारणाचे नियोजन सुरू होते. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार यंदा टाळण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या नव्या विहिरींचे खोदकाम आणि जुन्या विहिरीतील अनिर्बंध उपशावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय, येत्या उन्हाळ्यात गरज भासल्यास शासकीय टँकर सज्ज ठेवण्याचे निर्देशही आतापासूनच देण्यात आले आहेत.पाणीटंचाईच्या उपाययोजना दरवर्षी केवळ ३० जूनपर्यंत राबविण्यात येतात. यंदा मात्र, या उपाययोजना वर्षभर अमलत येणार आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात काहीसा दिलासादायक पाऊस झाला असला, तरी येत्या काळात भीषण टंचाईचे संकेत आहेतच. त्यासाठी प्रशासनाने पाण्याचे स्रोत काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका स्रोतापासून ५०० मीटर अंतरात दुसरी विहीर खोदण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच अस्तित्वातील विहिरीतून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोण्यात्याही कारणासाठी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त किंवा संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी गावनिहाय स्वतंत्र आराखडे लवकरच तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी सरासरीपेक्षा २ मीटरपेक्षा जेथील पाणीपातळी खाली गेली आहे, अशा गावांची लवकरच यादी तयार होणार आहे. तेथील जलस्रोत बळकटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विंधन विहिरींची वेळोवेळी दुरुस्ती करून त्या सदैव चालू स्थितीत ठेवण्याचेही निर्देश आहेत.दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अशावेळी शासकीय टँकरच वापरण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी झाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून जे टँकर पुरविले जातात, ते सुस्थितीत नसतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला नाईलाजाने खासगी टँकरचाच वापर करावा लागतो. यंदा, वेळेवर अशी धावपळ होऊ नये म्हणून सर्व शासकीय टँकर सुस्थितीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच टँकरने पाणीपुरवठा करताना अनेकदा शासनाची आर्थिक फसवणूक केली जाते. ठरलेल्या फेऱ्यांपेक्षा अधिक फेऱ्या झाल्याचे दाखवून जादा पैसे लाटले जातात. तसेच गावात एखाद्या ठरावीक घरापुढेच टँकर उभा करून अनेक गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचेही प्रकार पुढे आले आहेत. हा गैरप्रकार टाळण्यासाठी आता पाण्याच्या टँकरवरही जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावासाठी टंचाई निवारणाचा कमीत कमी खर्चाचा कृती आराखडा तयार करून पैशाची आणि पाण्याचीही काटकसर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)