सलून व्यावसायिकांची कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:27+5:30

विशेष बाब म्हणून नाभिक कुटुंबाच्या बँक खात्यात तीन महिन्यांचे ३० हजार रुपये जमा करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास मान्सूनच्या पहिल्या पुरात जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाव्यापी या आंदोलनाची सुरुवात येथील संतसेना चौकातून केली जाईल, असे या निवेदनात नमूद केले आहे.

Saloon professionals hit the office | सलून व्यावसायिकांची कचेरीवर धडक

सलून व्यावसायिकांची कचेरीवर धडक

Next
ठळक मुद्दे८ जूनचा अल्टीमेटम : आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अडचणीत आलेले सलून व्यावसायिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांनी प्रशासनाला ८ जूनचा अल्टीमेटम दिला आहे. जिल्ह्यातील सलून दुकाने, सलून पार्लर उघडण्याची परवानगी तत्काळ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सलून व्यवसाय बंद आहे. मध्यंतरी नऊ दिवस त्यांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र पुन्हा बंदचा आदेश काढण्यात आला. दुकाने बंद असल्यामुळे सलूनचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शिवाय दुकान किरायाचे असल्याने भाडे थकीत झाले. वीज बिलाचा भरणाही करण्यात आला नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सलूनची दुकाने सुरू करण्यासंदर्भात ८ जूनपर्यंत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणून नाभिक कुटुंबाच्या बँक खात्यात तीन महिन्यांचे ३० हजार रुपये जमा करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास मान्सूनच्या पहिल्या पुरात जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाव्यापी या आंदोलनाची सुरुवात येथील संतसेना चौकातून केली जाईल, असे या निवेदनात नमूद केले आहे. जिल्हा सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय मादेशवार आदींच्या स्वाक्षऱ्यांनिशी निवेदन देण्यात आले.

Web Title: Saloon professionals hit the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.