सागरला वैज्ञानिक व्हायचे आहे

By Admin | Updated: May 28, 2015 01:54 IST2015-05-28T01:54:29+5:302015-05-28T01:54:29+5:30

यवतमाळच्या अँग्लो हिंदी हायस्कूलचा विद्यार्थी सागर संजय नखत याने ६५० पैकी ६२३ गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले.

Sagar wants to be a scientist | सागरला वैज्ञानिक व्हायचे आहे

सागरला वैज्ञानिक व्हायचे आहे

यवतमाळ : यवतमाळच्या अँग्लो हिंदी हायस्कूलचा विद्यार्थी सागर संजय नखत याने ६५० पैकी ६२३ गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. सागरने भविष्यात वैज्ञानिक होण्याचा मानस व्यक्त केला. तो आपले पुढील शिक्षण नागपूर अथवा अमरावतीत घेणार असल्याचे त्याने ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
गिलानी नगरात वास्तव्याला असलेल्या सागरचे प्राथमिक शिक्षण विवेकानंद विद्यालयात पूर्ण झाले. शिक्षण घेताना तो प्रत्येक वर्षी गुणवत्तेच्या अग्रकमातच होता. त्याला १० वीमध्ये ९५ टक्के गुण मिळाले होेते. त्याने १२ वी च्या परिक्षेत आपली गुणवत्तेची टक्केवारी कायम ठेवली. माध्यमिक शालांत परिक्षेत त्याला ९५.८४ टक्के गुण मिळाले. त्याने वाचनापेक्षा समजून घेण्यावर अधिक भर दिला. शिकवणी वर्गातील पेपर सेट आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन याचा फायदा झाल्याचे सागर सांगतो. सागरला खेळ आणि वाचनाची सर्वाधिक आवड आहे.
सागरला गणित विषयात सर्वाधिक ९९ गुण मिळाले आहेत. जीवशास्त्र ९७ गुण, भौतिकशास्त्र ९५ गुण तर रसायनशास्त्रात ९० गुण मिळाले आहेत. संस्कृतमध्ये ९८, इंग्रजीमध्ये ९४ आणि पर्यावरण विषयात पूर्ण ५० गुण त्याने मिळविले. सागरने विज्ञान विषयात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने तो प्रयत्न करणार आहे.

Web Title: Sagar wants to be a scientist