शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

घटनेतील नियमात जीआर, परिपत्रकाने बदल करता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 9:55 AM

घटनेनुसार जे नियम तयार झाले आहेत, त्यात शासन निर्णय किंवा परिपत्रकाद्वारे ढवळाढवळ, बदल अथवा दुरुस्ती करता येत नाही. त्यासाठी विधीमंडळाची मान्यता बंधनकारक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देलेखा परीक्षकाचे निलंबन रद्द‘जेडी’ला अधिकारच नसल्याचे स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घटनेनुसार जे नियम तयार झाले आहेत, त्यात शासन निर्णय किंवा परिपत्रकाद्वारे ढवळाढवळ, बदल अथवा दुरुस्ती करता येत नाही. त्यासाठी विधीमंडळाची मान्यता बंधनकारक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी ८ सप्टेंबर २०२० रोजी दिला आहे.वरिष्ठ लेखा परीक्षक धर्मा गोपीचंद पवार यांनी ही याचिका दाखल केली होती. ते सोलापूर येथे स्थानिक निधी लेखा विभागाच्या सहसंचालक कार्यालयात कार्यरत आहे. त्यांचे निलंबन ‘मॅट’ने बेकायदेशीर असल्याचे सांगत रद्द ठरविले. सहसंचालकांना (स्थानिक निधी) लेखा परीक्षकाच्या निलंबनाचे अधिकारच नसल्याचे स्पष्ट केले. धर्मा पवार यांना दोन आठवड्यात पुनर्स्थापित करून नियुक्ती देण्याचे आदेश जारी करण्यात आले. नियुक्ती कुठे द्यावी याची मुभा मात्र शासनाला देण्यात आली. या खटल्यात सरकारच्यावतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून ए.जे. चौगुले तर याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. गौरव अरविंद बांदिवडेकर यांनी काम पाहिले.

प्रकरण असे, धर्मा पवार यांच्यावर एसीबीचा ट्रॅप झाल्याने ३१ ऑक्टोबर २०१९ ला त्यांंना अटक झाली. ४ नोव्हेंबर २०१९ ला त्यांंना निलंबित करण्यात आले. गेली वर्षभर ते निलंबित होते. या काळात त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र नाही, खातेनिहाय चौकशीची चार्जशीट नाही, निलंबनाचा आढावा घेतला गेला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई ‘मॅट’मध्ये धाव घेतली. तेथे स्थानिक निधी लेखा विभागाच्या पुणे सहसंचालकांनी केलेल्या निलंंबनालाच आव्हान दिले गेले.

‘चीफ ऑडिटर’ पद संचालकांच्या बरोबरपवार यांच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले की, डिसेंबर २००३ ला पवार यांना मुंबईच्या मुख्य लेखा परीक्षकांनी (चीफ ऑडिटर) वरिष्ठ ऑडिटर पदावर बढती दिली. मुख्य लेखा परीक्षकाचे हे पद लेखा व कोषागारे विभागात संचालकाच्या बरोबरीचे आहे. सहसंचालक हे पद मुख्य लेखा परीक्षकापेक्षा कमी दर्जाचे आहे. सहसंचालकांना नेमणुकीचे अधिकार नाहीत, त्यांनी नसलेले अधिकार वापरले आहेत आदी मुद्दे ‘मॅट’च्या निदर्शनास आणून देण्यात आले.

सरकार म्हणते, सहसंचालकांना अधिकारसरकारी पक्षाने सांगितले की, राज्य शासनाने २००८ ला नवे सेवा प्रवेश नियम लागू केले. त्या अनुषंगाने २ मार्च २००९ च्या जीआरनुसार सहसंचालकांना नियुक्तीचे अधिकार दिले आहेत. मात्र हा युक्तीवाद ‘मॅट’ने फेटाळून लावला.

निलंबन बेकायदेशीर ठरविलेसहसंचालक यांनी पवार यांचे केलेले निलंबन बेकायदेशीर ठरविण्यात आले, ते सक्षम अधिकारी नसल्याचे ‘मॅट’ने स्पष्ट केले. घटनेतील नियमात जीआर व परिपत्रकाद्वारे बदल करण्याच्या प्रकारावर नाराजीही व्यक्त केली. या खटल्यात पवार यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर, अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर व अ‍ॅड. गायत्री बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालय