शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आरटीओ करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:09 IST

प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी किती प्रवासी घ्यावेत याचे नियम आहेत. वाहन चालकांची नियमित तपासणी बंधनकारक आहे, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आरटीओंना दिल्या आहेत.  याबरोबरच वाहन सुस्थितीत आहे का, याची पडताळणीही नियमित करायला सांगितली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे नियमबाह्य आहे. कंपनीच्या परस्पर चालकांनी ट्रॅव्हल्समध्ये अतिरिक्त प्रवासी घेतले, असे सांगून कंपनीला जबाबदारी टाळता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिकजवळ भीषण अपघात होऊन १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. हे पुढे आले आहे. चालक परस्पर प्रवासी घेतात, असे म्हणून ट्रॅव्हल्स कंपनीला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, या प्रकरणात आरटीओतर्फे नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी किती प्रवासी घ्यावेत याचे नियम आहेत. वाहन चालकांची नियमित तपासणी बंधनकारक आहे, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आरटीओंना दिल्या आहेत.  याबरोबरच वाहन सुस्थितीत आहे का, याची पडताळणीही नियमित करायला सांगितली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे नियमबाह्य आहे. कंपनीच्या परस्पर चालकांनी ट्रॅव्हल्समध्ये अतिरिक्त प्रवासी घेतले, असे सांगून कंपनीला जबाबदारी टाळता येणार नाही. या प्रकरणातही या अनुषंगाने योग्य ते कार्यवाई करण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील खासगी प्रवासी वाहतुकीच्या ट्रॅव्हल्स पॉइंटसाठी शहराबाहेर पर्यायी जागा बघण्यासाठी सांगितले होते. ही जागा शहरापासून जवळ असावी, तसेच सुरक्षित ठिकाणी असावी, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगरपालिका आणि पोलीस विभागाला दिल्या होत्या. मात्र, अशी जागा उपलब्ध नसल्याचे आरटीओ कार्यालयाकडून कळविण्यात आले. त्यानंतर सध्याच्या ट्रॅव्हल्स पॉईंट ठिकाणची गाड्यांची गर्दी कमी झाली आहे. गाड्या आता मागील बाजूला लावल्या जात आहेत, असे आरटीओतर्फे सांगण्यात आले. मात्र, ट्रॅव्हल्सला नुकत्याच झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने ट्रॅव्हल्स पॉइंटसाठी पुन्हा नव्याने जागा शोधण्यास सांगण्यात येईल. ट्रॅव्हल्समुळे सध्याच्या ठिकाणी दुर्घटना होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश आरटीओंना दिले असून, काही दुर्घटना झाल्यास या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. 

अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याद्या बनविण्याच्या कामावर सुरुवातीला तलाठ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी विरोधाची भूमिका घेतली. संबंधित ग्रामसेवकांशी मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद साधत आहे. तर कृषी सहायकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याच्या सूचना कृषी अधीक्षकांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसfireआग