शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

रोड रॉबरीतील तिघांना पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:27 IST

पांढरकवडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलेल्या रोड रॉबरीतील दोन आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

ऑनलाईन लोकमतपांढरकवडा : पांढरकवडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलेल्या रोड रॉबरीतील दोन आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. चौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांना अनेक गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती आहे.दिलीप पवार व शामपाल पवार हे दोघेही आरोपी मुक्ताईनगर (जि.जळगाव) येथील असून त्या भागात त्यांनी रोड रॉबरीचे अनेक गुन्हे केले आहे. १५ ते २० दिवसांपासून आरोपी आपल्या कुटुंबासह केळापूरनजीक ताडपत्रीचा पाल टाकून वास्तव्यास आहे. सुनसान जागी राष्ट्रीय महामार्गावर रात्री १२ वाजतानंतर उभ्या असलेल्या ट्रकच्या कॅबीनमध्ये घुसायचे व चाकूच्या धाकावर ट्रकचालकास लुटायचे. असा प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू होता. आत्तापर्यंत त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोल-बुथ व केळापूर दरम्यान तीन-चार ट्रकचालकांना लुटले. परंतु त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. गेल्या १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास टोल बुथजवळ रस्त्याच्या बाजूने उभ्या असलेल्या ट्रकचालकास चाकूच्या धाकावर लूटले होते. ट्रकचालकाने घटनेची फिर्याद पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस या लुटारूंच्या शोधात होते. सोमवारपासून पोलीस दररोज रात्री या भागात आरोपीच्या शोधासाठी सापळे रचून होते. गुरूवारी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर आपल्या सहकाऱ्यासह राष्ट्रीय महामार्गावरील टोल बुथ ते केळापूर दरम्यान गस्तीवर असताना त्यांना पेट्रोल पंपाजवळ तीघेजण संशयीतरित्या फिरताना आढळून आले. त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करून अधिक कर्मचारी बोलावून घेतले.त्या तिघाही संशयिताची विचारपूस केली असता, त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे त्यांना पकडण्यासाठी त्यांच्यामागे पळाले असता, आरोपी दिलीप पवारने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. दुसरा आरोपी श्यामपाल पवार याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर यांच्यावर दगडाने हल्ला केला. परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी दोन्हीही आरोपींना पकडले. तिसरा आरोपी मात्र फरार होण्यास यशस्वी झाला. आरोपींवर जवळपास जिल्ह्यात खून, दरोडे, चोºया असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक असलम खान यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.