शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत दिवसभर आढावा

By admin | Updated: October 26, 2016 00:39 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला यांनी मंगळवारी दिवसर आढावा बैठक घेतली.

अधिकारी व्यस्त : विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतर प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्नयवतमाळ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला यांनी मंगळवारी दिवसर आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकारी, विभाग प्रमुख व्यस्त असताना सर्वच विभागातील कर्मचारी सुस्तावल्याचे दिसून आले. विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी गेल्या रविवारी १६ आॅक्टोबरला जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठक घेतली होती. बैठकीत त्यांनी प्रशासन गतीमान करण्याचे निर्देेश दिले होते. काही विभागांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आयुक्तांनी जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, शेततळे, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, पारधी आवास व शबरी आवास योजना, विभागीय चौकशी प्रकरणे, निलंबन, गैरहजेरी, अखर्चीत निधी, आश्रमशाळा, बालमृत्यू, सर्व्हीस बुक अद्यवतीकरण, सेवानिवृत्तांच्या प्रलंबित पेन्शन केस आदींचा आढावा घेतला होता.या आढावा बैठकीनंतर त्यांनी काही विभागांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. प्रशासन गतीमान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याला अनुसरून मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विभाग प्रमुखांकडून अद्ययावत माहिती जाणून घेतली. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे आज दिवसभर सीईओंच्या कक्षासमोर अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचाऱ्यांची वर्दळ होती. अनेक अधिकारी फाईली घेऊन ताटकळत दिसत होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अखर्चित निधीबाबात माहिती जाणून घेतली. कोणत्या योजनांवर आत्तापर्यंत नेमका किती खर्च झाला. अद्याप किती खर्च बाकी आहे. आचारसंहिता काळात निधी खर्च करताना कोणती काळजी घ्यावी, आदींबाबत त्यांनी निर्देशही दिले. नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रथमच ही आढावा बैठक झाली. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)कर्मचारी साडी खरेदीत गुंगसीईओंकडे आढावा बैठक सुरू असतानाच जिल्हा परिषद वास्तूत एक साडी विक्रेता शिरला. त्याने जवळपास प्रत्येक विभाग पालथा घातला. दुसऱ्या मजल्यावरील पाणी पुरवठा विभागात तर त्याच्याभोवती सर्व कर्मचारी गोळा झालेले आढळले. तो विक्रेता त्यांना साडी खरेदीची गळ घालत होता. काही महिला कर्मचारी साडी न्याहाळत होत्या. यात पुरूष कर्मचारीही मागे नव्हते. त्यांचीही साडी खरेदी करण्यासाठी भावबाजी सुरू होती. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळात ही साडी खरेदी-विक्री सुरू होती. आढावा बैठकीमुळे सर्वच विभागातील कर्मचारी सुस्तावल्याचे दिसून आले.