शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांपूर्वी पालकसचिवांकडून आढावा

By admin | Updated: November 18, 2014 23:03 IST

पश्चिम विदर्भातील खरीप पीक परिस्थितीचा आढावा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत घेणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी जिल्ह्याचे पालकसचिव व्ही.गिरीराज यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून

विकास योजनांवर चर्चा : जिल्हा परिषदेतही घेतली तब्बल दोन तास बैठक यवतमाळ : पश्चिम विदर्भातील खरीप पीक परिस्थितीचा आढावा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत घेणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी जिल्ह्याचे पालकसचिव व्ही.गिरीराज यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थिती जाणून घेतली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असलेले व्ही. गिरीराज जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. रबी व उन्हाळी ओलितासाठी धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यास सांगितले.जिल्ह्यात भीषण पाणी आणि चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता या बैठकीत वर्तविण्यात आली. जिल्ह्यात ७ लाख ७८ हजार पशुधन आहे. त्यांना जुलै महिन्यापर्यंत १५ लाख १३ हजार मेट्रीक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. खरिप - रबी आणि पडिक, जंगल क्षेत्रातून चारा उपलब्ध झाल्यानंतरही तब्बल एक लाख ३१ हजार मेट्रीक टन चाऱ्याची तूट भासणार आहे. अशा स्थितीत प्रशासनाकडून व्यवस्था केली जावी असा प्रस्ताव पालक सचिवासमोर ठेवण्यात आला. त्यानंतर जिल्हा कृषी अधिक्षक आणि कृषी विस्तार अधिकाऱ्यांकडून पीक स्थिती जाणून घेतली. सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली. रबीच्या पेरणीसाठी बियाणे आणि पाण्याची उलब्धता याचीही आकडेवारी सचिवांनी घेतली. त्यानंतर नगरपरिषद, ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणी टंचाईचा आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. धडक सिंचन योजनेतून मंजूर झालेल्या विहीर वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश दिले. ही योजना रोजगार हमी आणि जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येते. धडक सिंचनच्या विहीर बांधकामाला प्राधन्य देण्यास व्ही. गिरीराज यांनी सांगितले. शनिवारी खरीप आढावा बैठक होत आहे. विभागात बहुतांश गावात आणेवारी ५० टक्क्याच्या आत आहे. दुष्काळी परिस्थिीतीच्या उपाययोजना व बैठकीच्या तयारीच्या दृष्टीने अधिकारी अपडेट होत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)