शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:00 AM

पर्यावरण असंतुलनामुळे ऋतुचक्र प्रभावित झाले आहे. कधी पावसाळा लांबतो तर कधी मोठा खंड पडतो. मागील चार वर्षात परतीच्या पावसाचा कालावधी वाढला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसत आहे. पीक घरात येईपर्यंत कुठले संकट ओढवेल याची शाश्वतीच राहिली नाही. त्यामुळे शेतकरी परंपरागत पिकांच्या लागवडीबाबत साशंक झाला आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम धोक्यात : १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीचा पाऊस हा १५ सप्टेंबरपर्यंत कोसळतो. यावर्षी पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. हा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम धोक्यात आला असून शेतकरी संकटात आला आहे.पर्यावरण असंतुलनामुळे ऋतुचक्र प्रभावित झाले आहे. कधी पावसाळा लांबतो तर कधी मोठा खंड पडतो. मागील चार वर्षात परतीच्या पावसाचा कालावधी वाढला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसत आहे. पीक घरात येईपर्यंत कुठले संकट ओढवेल याची शाश्वतीच राहिली नाही. त्यामुळे शेतकरी परंपरागत पिकांच्या लागवडीबाबत साशंक झाला आहे. अति पाऊस - कमी पाऊस हे संकट सातत्याने सहन करावे लागत आहे. बदलत्या ऋतुमानानुसार कृषी शास्त्रज्ञांनी नव्या वाणाचा शोध लावण्याची गरज निर्माण झाली आहे. दुर्दैवाने देशात पिकांबाबत ऋतुमानानुसार संशोधन झालेच नाही. यावर हवामान अभ्यासकाच्या परिषदेत डॉ. सुरेश चोपणे यांनी चिंता व्यक्त केली. यावर्षीही अति पावसाने सोयाबीन व कपाशीचे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. सर्वाधिक लागवड खर्च असलेली कपाशी यावर्षी संकटात सापडली आहे. या वातावरणामुळे कृषी अभ्यासकांनी यावर्षी उत्पादनामध्ये मोठी घट येण्याचा धोका वर्तविला आहे. शेतकऱ्यांना पर्यायी पीक उपलब्ध नसल्याने परंरागत पद्धतीने शेती करावी लागत आहे. कृषी विद्यापीठांनी बदल्या ऋतुमानानुसार संशोधित वाण बाजारात आणले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चही उत्पादनातून मिळत नाही.कृषीचे अर्थचक्र मोसमी पावसावर अवलंबून आहे. यावर्षी परतीच्या पावसाने हे अर्थचक्र बिघडविले आहे. २४ सप्टेंबरला नागपूर विद्यापीठात विदर्भाचे अर्थशास्त्र आणि पर्यावरण यावर परिषद झाली. त्यात विदर्भातील हवामान अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली.- डॉ. सुरेश चोपणेहवामान अभ्यासक

टॅग्स :Rainपाऊस