शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाससाठी घ्यावे लागताहेत हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विनामूल्य सहा महिने प्रवास पास दिली जाते. ३१ डिसेंबर २०१८ रोजी महामंडळाने याविषयीचे परिपत्रक काढले. राज्यभरातील सुमारे ४२ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी या पत्रकानुसार अंमलबजावणीही केली जात आहे.

ठळक मुद्देआर्थिक दणका । यवतमाळ विभागीय कार्यालयाच्या कारभाराविषयी रोष व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकवाहिनीची सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या उदासीन कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. छोट्या-छोट्या कामासाठी त्यांना या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागते. आता त्यांना सहा महिन्याच्या विनामूल्य पासकरिता वारंवार चकरा माराव्या लागत आहे. पास नसल्याने त्यांना प्रवासाचा आर्थिक दणका बसत आहे.सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विनामूल्य सहा महिने प्रवास पास दिली जाते. ३१ डिसेंबर २०१८ रोजी महामंडळाने याविषयीचे परिपत्रक काढले. राज्यभरातील सुमारे ४२ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी या पत्रकानुसार अंमलबजावणीही केली जात आहे. यवतमाळ विभागातही या पास कर्मचाऱ्यांना मिळाल्या आहे. मात्र सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्याच्या पास त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. आज सप्टेंबरचे १५ दिवस निघून गेले आहे. या कालावधीत काही सेवानिवृत्तांना तिकीट काढून प्रवास करावा लागला आणि आताही पास मिळेपर्यंत करावा लागणार आहे. या पासवर पती-पत्नी अशा दोघांना विनाशुल्क प्रवास करता येतो. अचानक घडलेल्या प्रवासाच्यावेळी पासअभावी तिकीट काढण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. यवतमाळ विभागातील अनेक सेवानिवृत्त या पासपासून वंचित आहेत. याविषयी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने विभाग नियंत्रकांकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र दुर्लक्ष करण्यात आले. विनाशुल्क पासची योजना जुलैपासून सुरू होते. असे असतानाही आवश्यक तेवढ्या पासेस उपलब्ध करून घेण्याची तसदी या विभागाने दाखविली नाही. सेवानिवृत्त कामगारांना अतिशय तोकड्या निवृत्तीवेतनावर गुजरान करावी लागते. अशातच त्यांना केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. यावर अधिकाºयांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे दुर्लक्षमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांकडे महामंडळाचे दुर्लक्ष सुरू आहे. प्रश्न निकाली काढण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक बाबीविषयी प्रश्नांचा समावेश आहे. महामंडळ आणि शासनाने लक्ष देण्याची मागणी संघटनेकडून होत आहे.

टॅग्स :state transportएसटी