शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह घेऊन नातेवाईक ठाण्यात

By admin | Updated: March 27, 2017 01:18 IST

आरोपीच्या अटकेची मागणी करत व्यापाऱ्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक रविवारी दुपारी बिटरगाव ठाण्यात धडकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

व्यापाऱ्याचे खूनप्रकरण : संशयित बिटरगाव पोलिसांच्या ताब्यातढाणकी : आरोपीच्या अटकेची मागणी करत व्यापाऱ्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक रविवारी दुपारी बिटरगाव ठाण्यात धडकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. बिटरगाव येथील धान्य व्यापारी व्यंकटेश वसंतराव वट्टमवार (५०) यांचा शनिवारी सायंकाळी अज्ञातांनी खून केला होता. रविवारी शवविच्छेदनानंतर शववाहिनीतून मृतदेह थेट बिटरगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी व्यंकटेश वट्टमवार यांची पत्नी, मुलगा व इतर नातेवाईकांची समजूत काढली. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावरून नातेवाईकांनी मृतदेह घरी नेवून सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार केले.वट्टमवार यांच्या निर्घृण खुनामुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण रविवारीही कायम होते. दरम्यान पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या शिवाय मुख्य संशयित आरोपीबाबत पोलीस विविध माध्यमांतून तपास करीत आहे. संशयितांबाबत पोलिसांना धागेदोरे गवसले असल्याची माहिती असून नागरिकांनी सहकार्य केल्यास आरोपी पकडणे सोपे जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. (वार्ताहर)