शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची आचारसंहिता शिथिल करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २६ मार्च रोजी होऊ घातली होती. परंतु त्यापूर्वी दोन दिवस आधीच ही निवडणूक थांबविली गेली. सध्या बँकेत व्यवस्थापनाच्या देखरेखीत कारभार सुरू आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करायचे आहे. याशिवाय कर्जमाफी, व्याजमाफी व इतरही काही महत्वाचे विषय आहे. त्यावर संचालक मंडळाला चर्चा करायची आहे.

ठळक मुद्देनिवडणूक प्राधिकरण : संचालक मंडळाची ८ मे रोजी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप पीक कर्ज वाटपासह अनेक महत्वाचे विषय चर्चेला असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लागू असलेली निवडणूक आचारसंहिता शिथिल करावी, अशी विनंती बँकेने केली होती. मात्र प्राधिकरणाने ही विनंती फेटाळून लावली. परंतु बँकेच्या संचालक मंडळाची सभा घेण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २६ मार्च रोजी होऊ घातली होती. परंतु त्यापूर्वी दोन दिवस आधीच ही निवडणूक थांबविली गेली. सध्या बँकेत व्यवस्थापनाच्या देखरेखीत कारभार सुरू आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करायचे आहे. याशिवाय कर्जमाफी, व्याजमाफी व इतरही काही महत्वाचे विषय आहे. त्यावर संचालक मंडळाला चर्चा करायची आहे. त्याकरिता बँकेला लागू असलेली निवडणूक आचारसंहिता शिथिल करावी, अशी विनंती २० एप्रिल रोजी बँकेने अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे केली होती. मात्र आचारसंहिता शिथिल करता येणार नाही असे पत्र ३० एप्रिल रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी पाठविले.त्याचवेळी बँकेचे संचालक मंडळ व विविध समित्यांच्या बैठका घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. केवळ मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडेल असे निर्णय घेऊ नये याचे बंधन घातले गेले आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची ८ मे रोजी दुपारी १ वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. मासिक खर्चास मंजुरी, ताळेबंद, ठेवींचा आढावा, लॉकडाऊन काळात बँकेने घेतलेल्या निर्णयांची नोंद, ओटीएस धोरणास मुदतवाढ, नव्या सभासदांना पीक कर्ज वाटपाचा दर ठरविणे, शाखानिहाय ठेवींचे उद्दीष्ट निश्चित करणे, बँकेच्या ठेवींवरील व्याज दरात बदल करणे, नाबार्ड तपासणी अहवालावर चर्चा व नोंद, सुरक्षा व्यवस्थेच्या नव्या करारावर चर्चा अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मात्र कोणताही ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यास प्राधिकरणाने बँकेला मनाई केली आहे.लॉकडाऊननंतर निवडणुका कोणत्याही क्षणीजिल्ह्यात नियंत्रणात येत असलेली कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता १७ मे नंतर लॉकडाऊनची मुदत वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यानंतर पुढील काही दिवसात जिल्हा बँकेच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता संचालकांकडून व्यक्त केली जात आहे. कारण पूर्वीच्या नियोजित कार्यक्रमानुसार मतदानासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना निवडणुकीची ही प्रक्रिया थांबविली गेली होती. आता प्रत्यक्ष मतदान घेण्यापूर्वी किमान आठवड्याची मुदत प्रचारासाठी मिळावी, अशी अपेक्षाही संचालकांमधून व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :bankबँक