यवतमाळ जिल्ह्यातील वणीत रास्तारोको आंदोलन; कृषी धोरणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 13:01 IST2021-02-06T13:00:35+5:302021-02-06T13:01:13+5:30
Yawatmal News केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरूद्ध शनिवारी दुपारी १२ वरोरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील वणीत रास्तारोको आंदोलन; कृषी धोरणाला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरूद्ध शनिवारी दुपारी १२ वरोरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी व तर सर्व पक्ष आणि सामाजिक संघटना यात सहभाग घेणार आहेत. शेतकरी विरोधी तीन काळे कायदे याविरूद्ध हे आंदोलन पुकारले आहे. हा आदेश स्थगित करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.