शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

रावेरी गावातील रामायणकालीन आख्यायिकांना मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा भाग पूर्वीचा दंडकारण्याचा मानला जातो.

ठळक मुद्देदंडकारण्याचा भाग । सीतेचे अनेक वर्षे वास्तव्य, वाल्मिक ऋषींची समाधीही आहे

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : दूरचित्रवाहिनीवर सुरू असलेल्या ‘रामायण’ मालिकेमुळे रावेरीतील रामायणकालीन आख्यायिकांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. सीतेचे वास्तव्य, लव-कुश यांचा जन्म, वाल्मिक ऋषींची समाधी यासह सीतेला गावकऱ्यांनी नाकारलेले गहू आदी अनेक गोष्टी यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे.गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा भाग पूर्वीचा दंडकारण्याचा मानला जातो. प्रभू रामचंद्र यांच्या राज्याभिषेकानंतर सीता वनवासात भटकत असताना रावेरीत अनेक वर्षे वास्तव्यास होती. लव-कुश यांचा जन्म येथेच झाला. सीतेची न्हानी येथेच आहे. बारमाही वाहणारी रामगंगानदी ही रामायणातील तमसा नदी उत्तरवाहिनी आहे. वाल्मिक ऋषींची समाधी याठिकाणी आहे. लव-कुश यांच्या जन्मानंतर सीतेने गावकऱ्यांना गहू मागितले होते. त्याकाळी त्यांना कुणी गहू दिले नाही. त्यामुळे सीतेने येथे कधी गहू पिकणार नाही, असा शाप दिला होता. यामुळेच की काय गेली काही वर्षांपर्यंत गहू पिकत नव्हता असे सांगितले जाते. अश्वमेध यज्ञाचा घोडा लव-कुश यांनी रावेरी येथेच अडविला होता. यज्ञाचा घोडा परत नेण्यासाठी आलेल्या हनुमंताला लव-कुश यांनी याच ठिकाणी बांधून ठेवले होते, अशी आख्यायिका आहे. हनुमानाची १३ फुटांची मूर्ती अनेक शतकांपासून येथे रामायण काळातील घडामोडींची साक्ष देत उभी आहे. रामायणकालीन अनेक घटनांची साक्ष देणारी स्थळे येथेच आहेत. त्याप्रमाणे आख्यायिकाही प्रचलित राहिल्या आहे.देशातील एकमेव सीता मंदिरदेशात रामाची मंदिरे अनेक आहेत. पण सीतामाईचे हे एकमेव मंदिर रावेरीत आहे. दरवर्षी सीतानवमीला या गावात लहानमोठे कार्यक्रम होतात. शुक्रवारी सीमानवमी झाली पण, संचारबंदीच्या प्रतिबंधामुळे औपचारिकतेत कार्यक्रम पार पडला. एकूणच रामायण मालिकेने रावेरीच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा त्या काळातील ऐतिहासीक, पौराणिक घटनाक्रम समोर आला.

टॅग्स :Socialसामाजिक