लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव (यवतमाळ): शहरातील एका दाम्पत्याचे नाव घेऊन दोघांमध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप पुढे आली. या क्लिपवरून राळेगाव परिसरात अल्पवयीन मुलीची तस्करी होत असून लव जिहादमधून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान यांनी केला. शनिवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात धडक दिली. यावेळी आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके तेथे पोहोचले. रविवारी दिवसभर भाजप, बजरंगदल कार्यकर्ते, नागरिकांचा जमाव पोलिस ठाणे परिसरात होता.
भाजप जिल्हाध्यक्षाने ३४ मुली बेपत्ता असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या मजहर कुरेशी, कल्याणी कुरेशी यांना ताब्यात घेतले. पांढरकवडा उपविभागीय अधिकारी रॉबीन बन्सल, अपर अधीक्षक अशोक थोरात राळेगाव ठाण्यात दाखल झाले.
मात्र, मुलगी बेपत्ता झाली अशी तक्रार घेऊन रविवारी सायंकाळपर्यंत कुणीच पोलिसांपुढे हजर झाले नाही. उलट भाजप व बजरंगदल कार्यकर्ते चौकशीच्या मागणीसाठी ठाण्यात ठिय्या देऊन होते. तक्रार करण्यासाठी पीडितांनी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी पुढे यावे, असे आवाहन ठाणेदार शीतल मालटे यांनी केले आहे. सध्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरूनच पोलिस तपास करत आहे.
जमावामुळे शहरात तणाव
संशयिताच्या घरावर रविवारी सायंकाळी मोठा जमाव चालून गेला. यावेळी पोलिस सतर्क असल्याने दुर्घटना घडली नाही. मात्र ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर राळेगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Summary : Raalegaon faces tension after allegations of minor girl trafficking and religious conversion surfaced. Police detained two individuals based on an audio clip. Despite BJP's claims of 34 missing girls, no formal complaints have been filed. Police urge victims to come forward, investigating the audio clip.
Web Summary : रालेगांव में नाबालिग लड़कियों की तस्करी और धर्मांतरण के आरोपों के बाद तनाव है। पुलिस ने एक ऑडियो क्लिप के आधार पर दो लोगों को हिरासत में लिया। भाजपा के 34 लड़कियों के लापता होने के दावों के बावजूद, कोई औपचारिक शिकायत दर्ज नहीं की गई है। पुलिस पीड़ितों से आगे आने का आग्रह करती है, ऑडियो क्लिप की जांच कर रही है।