शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:09 IST

सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देकेळी बागा करपल्या : शेतकरी संकटात, आर्थिक नुकसानीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.उन्हाचा तडाखा सतत वाढत आहे. परिणामी पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतात उन्हाळी पीक उभे आहे. मात्र विहीर, बोअर आटल्याने सिंचन करणे अवघड झाले आहे. डोळ्यादेखत पिके वाळत आहे. यामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. तालुक्यातील सेलू, भोजला, मुंगशी, जामबाजार, एरंडा, कोपरा आदी परिसरात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दुष्काळ व अति उष्ण तापमानामुळे बागा करपत आहे. तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी धोक्यात आल्याने अर्थकारण अडचणीत सापडले. अति उष्ण तापमानामुळे पिल बाग, दुबार बहर असलेली बाग, निसवणीवर आलेले केळीचे धड तुटून नुकसान होत. काही बागांमध्ये केळीचे खोड मधून तुटून पडत आहे. उष्णतेची लाट कायम राहिल्यास नुकसान होणार आहे.पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडयावर्षी तालुक्यावर दुष्काळाचे संकट ओढवले. केळी उत्पादक ठिबक, तुषार सिंचन किंवा प्रसंगी टँकरने पाणी आणून मोठ्या मेहनतीने केळी बाग जगविण्याची धडपड करीत आहे. मात्र अति उष्णेमुळे बागा करपत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. केळी बागांचे नुकसान, ही नैसर्गिक आपत्ती मानली जात नसल्याने शेतकºयांना पीक विम्याचा दावा करता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाई