शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पुसद वनविभागाची जंगल सत्याग्रहींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:36 IST

तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देस्मृतिस्थळावर अभिवादन : कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.बेलगव्हाण घाटातील जंगलातील स्मृतीस्थळी पुसद वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे यांनी लोकनायक अणे यांच्या जंगल सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक विश्वास करे, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत, आनंद धोत्रे, पी.पी. गंगाखेडे, वसंतराव पाटील कान्हेकर, प्रा. नारायण क्षीरसागर, राजेश आसेगावकर, संभाजी टेटर, मनीष जाधव, ज्ञानेश्वर तडसे, विनोद जिल्हेवार, अविनाश पोळकट, विजय उबाळे, भाऊ मुडाणकर, सुनील गुद्धटवार, रवी देशपांडे, प्रा. दिनकर गुल्हाने, अनिल चेंडकाळे, संजय कोरटकर, सौरभ कोरटकर आदी उपस्थित होते.उपवनसंरक्षक मुंढे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील अणे यांच्या योगदानाची माहिती दिली. तसेच स्मृतीस्थळ विकासाबाबतचा आढावा सादर केला. प्रथम सर्वांनी स्मृती स्थळावर पुष्पमाला अर्पण करुन सत्याग्रहींना आदरांजली वाहिली. यावेळी शासनाच्या कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. वनरक्षक भाऊ बेले, भाऊ लहाडगे, भाऊ राठोड, पवने, खान आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग