शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये १३९ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST

शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ब्लास्ट होत आहे. आतापर्यंत एकूण २३३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मात्र १३९ जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. याशिवाय अनेकजण अद्यापही क्वारंटाईन आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

ठळक मुद्देआणखी नऊ पॉझिटिव्ह : अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचली ८७ वर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा हैदोस सुरू असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत १३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांचा आकडा २३३ वर पोहोचला आहे.शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ब्लास्ट होत आहे. आतापर्यंत एकूण २३३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मात्र १३९ जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. याशिवाय अनेकजण अद्यापही क्वारंटाईन आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मंगळवारी रात्री उशिरा आणखी पाच तर बुधवारी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात वसंतनगरमधील तीन पुरुष आणि महावीर वॉर्डातील एका पुरुषाचा समावेश आहे.शासन व प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र नागरिकांचे आवश्यक प्रमाणात सहकार्य मिळत नाही. परिणामी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत सतत वाढ होत आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत एकूण सात जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार आणि कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.हरीभाऊ फुपाटे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रतिबंधित क्षेत्रावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.तीन हजार रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट किट प्राप्तशहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुसदसाठी तीन हजार रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट किटची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तीन हजार किट उपलब्ध करून दिल्या आहे. या किट प्राप्त झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील मोठा ताण कमी झाला आहे. नागरिकांची चाचणी करण्यास आता वेग येणार असल्याचे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या