शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’चे यंत्र खरेदी प्रस्ताव रखडले

By admin | Updated: April 19, 2015 02:08 IST

येथील वसंतराव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक यंत्र सामग्री खरेदीचे प्रस्ताव मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण

यवतमाळ : येथील वसंतराव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक यंत्र सामग्री खरेदीचे प्रस्ताव मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) पाठविले होते. जानेवारीपासून या प्रस्तावावर कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात रुग्णालयाला एकही यंत्र खरेदी करता आली नाही. मेडिकलसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटी ८५ लाखांचा निधी मिळाला. मात्र अखेरच्या टप्प्यात या खरेदीला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने निविदा प्रक्रिया मार्च अखेरपूर्वी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली. नाईलाजाने चार कोटी ८५ लाखांचा निधी नियोजन समितीकडे परत करावा लागला. याहीपेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे जानेवारी महिन्यात रुग्णालय प्रशासनाने १०० एमएमच्या तीन एक्सरे मशीन, मच्युरी कुलर कॅबीनेट, थ्री पार्ट सीबीसी सेल काऊंटर, बॅरीअ‍ॅक्टीक सर्जरी आॅपरेशन टेबल, ब्लड गॅस अ‍ॅनालायझर इत्यादी मशीन व साहित्य खरेदीचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात डीएमईआरकडे पाठविला होता. तब्बल ५० लाखांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी हे प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र यावर डीएमईआरकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. साहित्य खरेदीसंदर्भात आलेले प्रस्ताव रुग्णालय प्रशासन डीएमईआरच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविते. यावर्षीचे प्रस्ताव डीएमईआरस्तरावरच प्रलंबित राहिल्याने नवीन शासनाच्या काळात एकही साहित्य खरेदी झालेली नाही. वरिल सर्व साहित्य रुग्णालयात नसल्याच्या त्रृट्या एमसीआयच्या (भारतीय आयुर्विज्ञान परिषद) पथकाने काढल्या आहेत. त्या दूर झाल्या तरच एमबीबीएस प्रथम वर्षाच्या ५० जागांची मान्यता कायम राहणार आहे. याशिवाय रुग्णसेवेतही अत्याधुनिक साधन सामग्री असल्यास त्याचा फायदा होता. रुग्णांवर नवीन तंत्राज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करून त्यांना लवकरात लवकर बरे करता येते. मात्र प्रशासकीय दफ्तरदिरंगाईमुळेच मेडिकलमधील साहित्य खरेदी रखडलेली असून त्याचा फटका रुग्णांना बसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)