शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

कापूस, सोयाबीन खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. तालुक्यातील व्यापाºयांवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे पडेल भावात शेतीमालाची खरेदी सुरू आहे. यातून अक्षरश: शेतकरी नागवले जात आहे. बाजार समितीने शेतकरी लुबाडले जाऊ नये म्हणून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही.

ठळक मुद्देमहागाव तालुका । शेतकऱ्यांची लूट, व्यापाऱ्यांची चांदी, बाजार समितीचे दुर्लक्ष

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शेतीमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ असमर्थ ठरत आहे. तालुक्यात कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू असताना संचालक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी हातावर हात देऊन बसले आहे.कापूस, सोयाबीन खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. तालुक्यातील व्यापाºयांवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे पडेल भावात शेतीमालाची खरेदी सुरू आहे. यातून अक्षरश: शेतकरी नागवले जात आहे. बाजार समितीने शेतकरी लुबाडले जाऊ नये म्हणून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. त्याचाच लाभ खासगी व्यापारी घेऊ लागले आहे. सोयाबीन, कापसाची मातीमोल भावाने खरेदी केली जात असल्याची ओरड शेतकरी करीत आहे. व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून बाजार समितीच्या संचालक मंडळाने कार्य करायचे असताना येथील संचालक मंडळ शेतकरी हितासाठी कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही.तालुक्यातील बहुतांश व्यापाऱ्यांचे वजन, काटे बरोबर नाही. याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बाजार समिती अधिकार वापरत नाही. फुलसांवगी, हिवरा, काळी दौ. हे कापूस, सोयाबीन खरेदी-विक्रीचे सर्वात मोठे केंद्र आहे. तेथे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. सोयाबीनचा तीन हजार ७१0, तर कापसाचा पाच हजार ५00 रुपये हमीभाव ठरला आहे. मात्र हमी भावापेक्षा कितीतरी अधिक पटीने कमी किमतीत शेतीमालाची खरेदी सुरू आहे. समितीचा सेस बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, शेतमालाला आर्द्रता दाखवून मातीमोल भावात खरेदी बंद करा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. अन्यथा १८ नोव्हेंबरपासून समितीच्या प्रांगणात शेतकरी उपोषणाला बसतील, असा इशारा तालुका शेतकरी संघर्ष समितीचे अंकुश आडे, प्रवीण जाधव, नामदेव आडे आदींनी दिला आहे.कर्मचारी भरतीवर टांगती तलवारबाजार समितीच्या उत्पन्नात घट येत असताना कर्मचारी भरती करण्यात आली. मात्र कर्मचाºयांच्या हाताला काम नसताना वेतनाचा खर्च सहन करावा लागतो. अशात केंद्र सरकारने आता बाजार समित्या बरखास्त करण्याचा इशारा दिला. यामुळे सहकार क्षेत्रातील बाजार समित्या पूर्णत: बंद झाल्या तर भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचारी भरतीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती