‘मेडिकल’च्या आठ अधिव्याख्यात्यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 02:35 IST2015-06-10T02:35:02+5:302015-06-10T02:35:02+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ अधिव्याख्यातांची सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली आहे.

‘मेडिकल’च्या आठ अधिव्याख्यात्यांना पदोन्नती
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ अधिव्याख्यातांची सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर या अधिव्याख्यात्यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ.किशोर इंगोले यांना पदोन्नतीसाठी सातारा येथे जावे लागले.
गेल्या अनेक वर्षांपासून अधिव्याख्याता म्हणून काम करणाऱ्या या डॉक्टरांकडून पदोन्नतीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचनालयाकडे पाठपुरावा सुरू होता. सरकार बदलल्याने पदोन्नती प्रक्रियेबाबत आशा निर्माण झाल्या आहे. डॉ.किशोर इंगोले यांना सातारा येथे तर न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ.शरद कुचवार यांची अकोला येथे पदोन्नतीवर बदली झाली. नाक, कान, घसा विभागाचे डॉ.प्रशांत केचे, बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉ.धरम पवार, बालरोगशास्त्र विभागाचे डॉ.रवी चव्हाण, दंत चिकित्सा विभागाचे डॉ.आशा काळबांडे, विकृतीशास्त्र विभागाचे डॉ.नीलिमा सुराणा, डॉ.खांडेकर यांची महाविद्यालयातच पदोन्नतीवर सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बऱ्याच वर्षानंतर शासनस्तरावर दखल घेतल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील या वैद्यकीय महाविद्यालयाला पूर्ण पदभरतीचा बुस्ट देणे गरजेचे आहे. तरच येथील रुग्णसेवा आणखी सुसज्ज करता येणार आहे. या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा शासनाकडून लागल्या आहे. (कार्यालय प्रतिनिधी)