शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डावॉर्डात प्रचाराचा धुराळा

By admin | Updated: November 17, 2016 01:34 IST

नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराने वातावरण चांगलेच तापले असून उमेदवार वॉर्डावॉर्डात आपली

उमरखेड नगरपरिषद : सर्वच पक्षाचे कार्यकर्ते लागले कामालाउमरखेड : नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराने वातावरण चांगलेच तापले असून उमेदवार वॉर्डावॉर्डात आपली प्रचार रॅली काढून धुराळा उडवित आहे. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असून प्रत्येकजण आपल्या विजयाचा दावा करीत आहे. नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष व २४ नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम, बसपा, प्रहारने संपूर्ण शहरात जोरात प्रचार सुरू केला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत उमेदवार व कार्यकर्ते मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारात जात आहे. उमरखेड नगरपालिकेमध्ये यावर्षीची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. आजपर्यंत उमरखेड नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या सरळ लढतीने झाल्या. परंतु या निवडणुकीत प्रथमच चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मतदारात संभ्रम निर्माण झालेला आहे. यावेळी सर्वात जास्त काँग्रेसच्या परंपरागत मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराचे मताधिक्य कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. गत निवडणुकीमध्ये अग्रवाल व माहेश्वरी या दोन गटांनी एकत्र निवडणूक लढविली. त्यामुळे नगरपालिकेत सत्ता बहुमतात येवून अध्यक्ष व उपाध्यक्ष त्यांचाच झाला होता. परंतु या निवडणुकीत तसे चित्र नाही. दोघांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे राजकीय वाद विकोपाला गेला. त्यामुळे ते एकमेकांच्याविरोधात लढत आहे. या दोघातील वादामुळे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांची गोची होताना दिसत आहे. भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, प्रहार, एमआयएम या पक्षांनी प्रचारयंत्रणा जोरकसपणे राबविली आहे. वॉर्डावॉर्डात प्रचार रॅली काढून मतदारांना आकर्षित केले जात आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचार रॅलीमुळे शहरात चैतन्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी निवडणुकीचीच चर्चा होताना दिसत आहे. जीवाचे रान करून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होत आहे. गर्दीसाठी कार्यकर्त्यांना रोजंदारीवर बोलावत आहेत. (शहर प्रतिनिधी)