शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत जनतेचे प्रश्न अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गंभीर असतानाही पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे.

ठळक मुद्देतक्रारींकडे दुर्लक्ष : कर्मचारी अपुरे असल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी यवतमाळ नगरपरिषदेकडे वेळ नाही. नागरिकांच्या अनेक तक्रारी पालिकेच्या विविध विभागात धूळ खात पडून आहे. समस्या निकाली काढण्यासाठी कर्मचारी अपुरे असल्याचे कारण पालिकेकडून सांगितले जाते, तर किती काळ प्रश्न निकाली निघणार नाही हा नागरिकांचा प्रश्न आहे.शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गंभीर असतानाही पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे.अनेक भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. घर परिसरातच गटार तयार झाली आहेत. त्यात वाढलेला डासांचा प्रादुर्भाव आणि सुटणारी दुर्गंधी जीवघेणी ठरत आहे. घंटागाड्या नियमित येत नसल्याने घरातला कचरा परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी नाईलाजाने टाकावा लागतो. अनेक भागातील पथदिवे बंद आहे. पाऊस लांबल्याने वाढलेली झुडपं अजूनही हिरवीगार आहेत. त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. अगदी वर्दळीच्या रस्त्यावरही ही जनावरे दृष्टीस पडतात. याविषयीच्या तक्रारी नगरपरिषदेकडून दुर्लक्षित आहे. अभियंता नाही, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे आदी कारणांचा पाढा पदाधिकारी आणि प्रशासनाकडून वाचला जातो. याचा अनुभव अनेकांना येत आहे. वॉर्डाशी संबंधित नगरसेवकांना तर आपल्या जबाबदारीविषयी कुठलेही भान नसल्याचे दिसून येते. वॉर्डात अपवादानेही त्यांची चक्कर होत नाही. परिणामी समस्या दीर्घकाळपर्यंत कायम राहात आहे.छत्रपती सोसायटीत शेजारी त्रस्तउमरसरा परिसरात असलेल्या छत्रपती सोसायटीत शेजाऱ्याने सांडपाणी मोकळे सोडून दिले. याचा त्रास होत असल्याची तक्रार विलास हरिभाऊ देशमुख यांनी यवतमाळ नगरपरिषदेकडे केली. तक्रारीवर काय कारवाई झाली याची चौकशी करण्यास गेलेल्या देशमुख यांना नगरपरिषदेकडून आमच्याकडे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे उत्तर मिळाले. कर्मचाऱ्यांचा तुटवडा केव्हा भरून निघणार आणि समस्या कधी निकाली निघेल, हा त्यांचा प्रश्न आहे.

टॅग्स :Socialसामाजिक