शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे दर पडलेलेच अन् तूरडाळ उसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:14 IST

रेशन दुकानातील तूरडाळीच्या दरात वाढ झाली. हे दर वाढताच खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपयांवर पोहचले आहे.

ठळक मुद्देनफा व्यापाऱ्यांच्याच घशात रेशनची डाळ महागताच व्यापाऱ्यांनी दर वाढविले

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशन दुकानातील तूरडाळीच्या दरात वाढ झाली. हे दर वाढताच खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपयांवर पोहचले आहे. विशेष म्हणजे, तूरडाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या तुरीचे दर जैसे थे आहे. तरी व्यापाऱ्यांनी तूरडाळीचे दर किलोमागे २० रूपयांनी वाढविले आहेत. त्यामुळे अव्वाच्या सव्वा नफा व्यापाऱ्यांच्या पदरात पडला आहे. तर शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला.गरिबांनाही तूरडाळ खरेदी करता यावी म्हणून रेशन दुकानामधून तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ही तूरडाळ मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची प्रक्रिया वाढली. याच सुमारास पुरवठा विभागाने डाळीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. याच्या अंमलबजावणीचे आदेश राज्यभरातील पुरवठा विभागात धडकले आहेत. यामुळे रेशनवरची तूरडाळ १५ रूपयांनी महाग होणार आहे.दोन वर्षांपूर्वी तूरडाळ १४० रूपये किलोवर पोहोचली होती. गरीब कुटुंबांना ही डाळ खरेदी करणे म्हणजे स्वप्न ठरले होते. राज्यशासनाने हस्तक्षेप करून स्वस्तधान्य दुकानातून तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. ४० रूपये किलो दराने तूरडाळीचा पुरवठा सुरू झाला. यामुळे नागरिकांची पहिली पसंती तूरडाळीला मिळाली. रेशन दुकानातून तूरडाळ खरेदीचे प्रमाण वाढले.तूरडाळीची मागणी रेशन दुकानात वाढल्याने याचा फटका व्यापाऱ्यांना बसला. झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच व्यापाऱ्यांनी नवीन खेळी केली आहे. स्वस्तधान्य दुकानातील ४० रूपये किलोची तूरडाळ ५५ रूपये किलो झाली. यामध्ये किलोमागे १५ रूपयांची वाढ करण्यात आली. याच संधीचा फायदा घेत तूरडाळ व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ६५ रूपयांवरून ८५ रूपयांवर नेले.क्विंटलमागे दोन हजारांचा नफाज्या तुरीपासून डाळ तयार होते, त्या तुरीचे दर ४७०० ते ५००० रूपये क्विंटल आहे. एका क्विंटलपासून ७२ किलो डाळ तयार होते. २८ किलोचे बेसन आणि कनोर मिळते. त्याचे पैसे वेगळे. ७२ किलो तूरडाळीचे पैसे आणि २८ किलो बेसन आणि कनोर याचा सध्याचा दर धरला तर क्विंटलमागे दोन हजार रूपयांचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. विशेष म्हणजे, एक क्विंटल तूरडाळीवर प्रक्रिया करण्यासाठी विजेचा खर्च नगण्य आहे. शेतकऱ्यांना वर्षभर घाम गाळून जो नफा मिळाला नाही, तो नफा काही तासात व्यापाऱ्यांनी खिशात पाडून घेतला आहे.

टॅग्स :agricultureशेती