शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

प्रदीपच्या खुनाचा तपास आश्रमशाळेभोवती केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:11 IST

पहिल्या वर्गात शिकणाºया निरागस प्रदीप शेळकेच्या खुनाचे दुसºया दिवशीही गूढ कायम आहे.

ठळक मुद्देगूढ कायम : श्वानाने दाखविला शाळेपर्यंत मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : पहिल्या वर्गात शिकणाºया निरागस प्रदीप शेळकेच्या खुनाचे दुसºया दिवशीही गूढ कायम आहे. पोलीस विविध बाजूंनी तपास करीत असून श्वानाने शाळेपर्यंत माग दाखविल्याने खुनाचा तपास शाळेभोवती केंद्रित झाला आहे. दरम्यान, शवविच्छेदन करून प्रदीपचे प्रेत पार्डी चुरमूरा येथे नेण्यात आले.ढाणकी येथील अनुदानित आश्रमशाळेत शिकणाºया प्रदीप संदीप शेळके (७) रा.पार्डी चुरमूरा याचा दगडाने ठेचून खून केल्याचे सोमवारी उघडकीस आले होते. त्याचा मृतदेह शाळेपासून ५०० फूट अंतरावर कोरड्या तलावाजवळ आढळला होता. खुनाचे गूढ उकलण्याचे आव्हान अद्यापही पोलिसांपुढे कायम आहे. विविध बाजूंनी पोलीस तपास घेत आहे. मंगळवारी अमरावती येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पथकातील ‘जॉनी’ या श्वानाने घटनास्थळावरून थेट प्रदीप शिकत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेकडे धाव घेतली. त्याचक्षणी पोलिसांनी आदिवासी आश्रमशाळेभोवती आपला तपास केंद्रित केला. काही विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाºयांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्या बयानात पोलिसांना एकवाक्यता आढळून आली नाही. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात प्रदीप जेवण करून ताट घेऊन जाताना दिसत होता, तर दुसºया सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे जण एक पांढºया रंगाचे पोते शाळेच्या व्हरांड्यातून ओढत असताना दिसून येते. तर काही कर्मचारी एका खोलीत आपसात चर्चा करताना दिसत आहे. त्यानंतर वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव ढाणकी येथे डेरे दाखल झाले. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एपीआय सूरज बोंडे, बिटरगावचे ठाणेदार प्रकाश राऊत, पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप मारेकºयांचा शोध घेत आहे.बिरसा ब्रिगेडतर्फे चौकशीची मागणीढाणकी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी बिरसा ब्रिगेडने शवविच्छेदन गृहासमोर आंदोलन केले. कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी मुलाचे वडील संदीप सुभाष शेळके, जयवंत वानोळे, हनवंता खोकले, अर्जुन जाधवर आदी उपस्थित होते.मुख्याध्यापकासह तीन कर्मचारी निलंबितप्रदीप शेळकेच्या खुनाने आदिवासी प्रकल्प विभाग हादरून गेला आहे. ढाणकी येथील अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका नीता कुंभारे, वसतिगृह अधीक्षक गणेश वानखेडे, चौकीदार संतोष हुलकाने यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई पुसद येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी गणेश युवनाते यांच्या अहवालावरून अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी केली.