कुंभार समाजाला मिळाली माती, स्टॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:16 IST2018-09-17T21:16:28+5:302018-09-17T21:16:45+5:30
मूर्ती घडविण्यासाठी लागणारी माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्याने कुंभार समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. याबद्दल कुंभार समाज बहुद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मातीचा गणपती भेट देण्यात आला.

कुंभार समाजाला मिळाली माती, स्टॉल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मूर्ती घडविण्यासाठी लागणारी माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्याने कुंभार समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. याबद्दल कुंभार समाज बहुद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मातीचा गणपती भेट देण्यात आला.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बंदीबाबत शासनाकडून कठोर नियम केले जावे, पर्यावरण रक्षणासाठी मातीच्या मूर्ती तयार करणाºया कुंभार बांधवांसाठी विशिष्ट योजना राबवावी, कुंभार कारागिरांना प्रोत्साहनाच्यादृष्टीने विशेष प्रदर्शन आणि विक्रीकरिता मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. याप्रसंगी कुंभार समाज बहुद्देशीय संस्थेचे विदर्भ अध्यक्ष के.एन. मोरे, अशोक अंबाघरे, माधवराव लहेकर, लक्ष्मीकांत प्रजापती, विक्की बेहरे, नमो प्रजापती आदी उपस्थित होते.