शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला, १ ऑगस्टपासून लागू होणार; दंडही ठोठावला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
4
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
5
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
6
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
7
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
8
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
9
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
10
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
11
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
12
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
13
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
14
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
15
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
16
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
17
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
18
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
19
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
20
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!

चोरट्याचे धाडस, चक्क पोलीस ठाण्यातच केली चोरी; अंमलदाराची दुचाकी घेऊन पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 17:01 IST

ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला.

ठळक मुद्देघटना सीसीटीव्हीत कैद

यवतमाळ : शहरात पोलिसांचा धाक नाममात्र शिल्लक राहिलेला नाही. बुधवारी पहाटे १९ वर्षीय चोरट्याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात जावून दुचाकीचे लॉक तोडले. ती दुचाकी घेवून तो पसार झाला. डायरी अंमलदार असलेल्या पोलीस नाईक कर्मचाऱ्याची ही दुचाकी होती. सकाळी ड्युटी संपल्यानंतर दुचाकी चोरी गेल्याचे उघडकीस आले.

पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेण्यासाठी गेले. मात्र, त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला.

टीशर्ट घातलेला एक युवक पहिले ठाण्यात आला. त्याने तेथे ठेवलेल्या दुचाकींची लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. पोलीस येतील याचा अंदाज येताच तो पोलीस ठाण्याच्या बाहेर आला. नंतर त्याने ठाणेदाराच्या कक्षामागून अरुंद बोळीतून पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला. तेथे बानते यांच्या दुचाकीचे लॉक तोडले व ती दुचाकी घेवून पसार झाला. हा घटनाक्रम पाहिल्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेणे सुरू केले.

चोरी करणारा युवकच आला तक्रार देण्यास

बुधवारी दुपारी १ वाजता दुचाकी चोरणारा सुरेश उर्फ जादू नरेश कलांडे (१९) रा. पारवा हा पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने हातावर ब्लेडने वार केले होते. स्वत:च्या आईच्या विरोधातच तक्रार देण्यासाठी ठाण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला दुचाकी चोर हाच आहे हे लक्षात येताच पोलिसांनी जादूला ताब्यात घेतले. काही वेळाने त्याची आई अनिता कलांडे ही पाेलीस ठाण्यात पोहोचली. मुलगा व्यवस्थित राहत नसून तो वाद करून खोटी तक्रार देण्यासाठी आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तसेच त्याने दुचाकी घरी आणल्याचेही सांगितले. मुलाचा कायमचा बंदोबस्त करा, त्याला कारागृहाबाहेर पडू देऊ नका अशी आर्जव अनिता कलांडे यांनी अवधूतवाडी पोलिसांकडे केली.पोलीस ठाण्यातून गाडी चोरली, पोलीस काय बिघडविणार

सराईत चोर असलेल्या सुरेश उर्फ जादू कलांडेने चोरीची दुचाकी घेवून पारवा हे गाव गाठले. गावात जावून त्याने सर्वांना सांगितले, पोलीस माझे काहीच वाकड करणार नाही, पोलिसाचीच दुचाकी पोलीस ठाण्यातून आणली आहे असे म्हणून जादूने स्वत:च्या आईसोबतच वाद घालणे सुरू केले. आधार कार्डासाठी टीसी हवी या कारणावरून तो आई व बहिणीसोबत भांडत होता. जादूच्या कारनाम्यामुळे कलांडे कुटुंबीय त्रस्त झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीbikeबाईकPolice Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस