शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, दिग्रसवर पोलीस तपास केंद्रीत

By admin | Updated: September 11, 2016 00:54 IST

मुंबईच्या व्यापाऱ्यांचे ८० लाखांचे दागिने बसस्थानकावरुन चोरी गेल्याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अमरावती आणि

८० लाखांची दागिने चोरी : बॅग लिफ्टरयवतमाळ : मुंबईच्या व्यापाऱ्यांचे ८० लाखांचे दागिने बसस्थानकावरुन चोरी गेल्याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अमरावती आणि दिग्रसच्या रेकॉर्डवरील बॅग लिफ्टरवर तपास केंद्रीत केला आहे. मुंबईतील सराफ व्यापाऱ्याचे तीन किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने शुक्रवारी सकाळी ७ वाजता यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरुन चोरीला गेले होते. हा व्यापारी जालना बसमध्ये चढताना त्याची बॅग कापून दागिने पळविण्यात आले. वडगाव रोड पोलिसांनी विविध पैलूंनी या गुन्ह्याचा तपास चालविला आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्हीमधून काही क्ल्यू मिळतो का या दृष्टीने प्रयत्न चालविले आहे. दिग्रस आणि अमरावतीमधील बॅग लिफ्टर टोळी पोलिसात सर्वदूर परिचित आहे. या टोळीच्या सदस्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय या व्यापाऱ्यांचा मुंबई, आदिलाबाद, यवतमाळ या प्रवासादरम्यान कुणी पाठलाग केला का, हॉटेलपासून कुणी मागावर होते का, कुणी टीप दिली का तसेच खरोखरच ८० लाखांचे सोने बॅगेत होते का, अशा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)