जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:10+5:30

जिल्ह्यातील संवदेनशील ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची पूर्णवेळ गस्त होती. शनिवारी सकाळी अयोध्या निकालाबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. चहाटपऱ्या व चौकांमध्ये निकालाबाबत चर्चेचे फड रंगले. मात्र याचा येथील दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम दिसला नाही. प्रशासनाने केवळ दक्षता म्हणून बंदोबस्त लावला व इतर योग्य ती खबरदारी घेतली.

Police in the district | जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्देराखीव दलाची तुकडी तैनात । शाळांनाही दुपारच्या सत्रात दिली सुट्टी

अयोध्या निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अयोध्येतील जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. तत्पूर्वी सामाजिक शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन केले होते. संपूर्ण जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारच्या सत्रात शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली.
जिल्ह्यातील संवदेनशील ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची पूर्णवेळ गस्त होती. शनिवारी सकाळी अयोध्या निकालाबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. चहाटपऱ्या व चौकांमध्ये निकालाबाबत चर्चेचे फड रंगले. मात्र याचा येथील दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम दिसला नाही. प्रशासनाने केवळ दक्षता म्हणून बंदोबस्त लावला व इतर योग्य ती खबरदारी घेतली. महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता. बाजारपेठेतही नेहमीसारखीच वर्दळ होती. निकालाबाबत प्रत्येक जण कानोसा घेत होता. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील शाळांना दुपारी सुटी देण्यात आली. याबाबत शिक्षण संचालक स्तरावरून सूचना असल्याचे सांगण्यात आले. दारव्हा येथे सर्वधर्मीयांनी शांतता रॅली काढून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन केले. यवतमाळात अवधुतवाडी ठाण्यांतर्गत काही जणांकडून फटाके फोडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. राज्य राखीव दलाची एक कंपनी व दोन प्लाटून जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या. याशिवाय १२०० गृहरक्षक दलाचे जवान आणि जिल्हा पोलीस दलातील २ हजार ७०० अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर होते.

व्हॉट्सअप ग्रूपवर अ‍ॅडमीनचा ताबा
अनेकांनी सोशल मीडियावर अयोध्या निकालावर कोणतीही टीका टिप्पणी करणारे मॅसेज व्हायरल करण्याला प्रतिबंध घातला. ज्यांनी आपले व्हॉट्सअप ग्रूप केले होते, त्या अ‍ॅडमीननी ‘ओन्ली फॉर अ‍ॅडमीन’ आॅप्शनचा वापर केला. सर्वांनीच दक्षता बाळगत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.

Web Title: Police in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.