शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातही कोरोना रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

मुंबईतील रुग्णालयामध्ये अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. दिल्ली सरकारनेही प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (एम्स) संस्था दिल्ली येथील तज्ज्ञांनीही प्लाझ्मा थेरपीला दुजोरा दिला आहे. त्यादृष्टीने यवतमाळ मेडिकलच्या डॉक्टरांनी तशी तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांची तयारी : निगेटिव्ह झालेल्या व्यक्तीच्या रक्ताचा उपयोग

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना रुग्णाला बरे करण्यासाठी विविध औषधी व उपचारपध्दती अवलंबिल्या जात आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांना प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचे निर्देश दिले. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने यासाठी तयारी केली आहे. गरज पडल्यास कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपी वापरली जाणार आहे.मुंबईतील रुग्णालयामध्ये अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. दिल्ली सरकारनेही प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (एम्स) संस्था दिल्ली येथील तज्ज्ञांनीही प्लाझ्मा थेरपीला दुजोरा दिला आहे. त्यादृष्टीने यवतमाळ मेडिकलच्या डॉक्टरांनी तशी तयारी सुरू केली आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यातून पूर्णपणे निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या रक्ताचा उपयोग केला जातो. निगेटिव्ह रिपोर्ट आल्यापासून २८ दिवस कालावधी पूर्ण झाला व या काळात त्या व्यक्तीला कोविडसह इतर कुठल्याही आजाराची लक्षणे नाही, अशाच व्यक्तीचे रक्त प्लाझ्मासाठी वापरले जाते.वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने अशा तीन जणांची निवड केली. मात्र त्यातील दोघांमध्ये इतर काही किरकोळ आजाराची लक्षणे असल्याने शिवाय त्यातील एकाचे वय ५५ वर्षेपेक्षा अधिक असल्याने त्यांचे रक्त प्लाझ्मासाठी वापरणे टाळले. एकाच्या रक्ताचा वापर प्लाझ्मासाठी केला जाणार आहे. तूर्त एक बॅगपासून प्लाझ्मा वेगळा करून तो ठेवण्यात येणार आहे. गरज पडल्यास आयसोलेशन वॉर्डातील कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्याची तयारी करण्यात आली आहे.नवीन मशीन खरेदीचा प्रस्तावमेडिकलच्या कोरोना चाचणी लॅबमध्ये २४ तासात दीडशे नमुन्यांची तपासणी होते. ही क्षमता आणखी वाढविण्यासाठी नवीन मशीन खरेदीचा प्रस्ताव आहे. यात ऑटोमॅटिक न्यूक्लीक अ‍ॅसीड एक्स्ट्रेशन मशीन व आरटीपीसीआर मशीन असे दोन पर्याय ठेवले आहेत. आता सध्या यवतमाळ व वाशिम या दोन जिल्ह्यातील नमुन्यांची तपासणी केली जाते. बुधवारपासून बुलडाणा जिल्ह्यातील नमुन्यांची तपासणी यवतमाळात करण्यात येणार आहे.प्लाझ्मा थेरपीचा वापर करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. योग्य व्यक्तीचे रक्त घेऊन प्लाझ्मा संग्रही ठेवला जात आहे.- डॉ.मिलिंद कांबळे,कोरोना समन्वयकवैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या