शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी

By admin | Updated: November 4, 2014 22:47 IST

तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या

अविनाश खंदारे - उमरखेड (कुपटी)तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येत असून पैनगंगेच्या भरोशावर सिंचन करणारे शेतकरीही अडचणीत आले आहे.यावर्षी उमरखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. सध्या नदीचे पात्र कोरडे असून नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पैनगंगेसोबतच परिसरातील सर्व नदी, नालेही कोरडे झाले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी उन्हाळ्यात जाणवते. मात्र हिवाळ्यात यंदा पहिल्यांदाच जाणवू लागली आहे. त्यामुळे नदी तीरावरील तिवरंग, झाडगाव, भांबरखेडा, जगापूर, गौळ, हातला, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, बारा, चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, टाकळी, साखरा, खरूस, दिघडी, लोहरा, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सिंदगी, सोईट, गाजेगाव, ढाणकी, बिटरगाव, भोजनगर तांडा, सावळेश्वर, आकोली, मुरली, थेरडी, परोटी वन, गाडी, जवराळा, खरबी, दराटी, मोरचंडी या भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे.या परिसरातील महिला व पुरुषांना पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तालुका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. पैनगंगेच्या तीरावरून अनेक गावांच्या नळयोजना आहे. परंतु पैनगंगा आटल्याने या विहिरीतील पाणीही तळाला लागले आहे. त्यामुळे अनेक नळयोजना अखेरचा श्वास घेत आहे. त्यातच भारनियमनानेही पाणी गावापर्यंत पोहोचविणे अशक्य होत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तीव्र होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गोपालन केले जाते. परंतु पाणीटंचाईने जनावरांसाठी पाणी उपलब्ध कसे करावे, असा प्रश्न आहे. अनेक शेतकरी पैनगंगेवर मोटरपंप लावून रबीचे सिंचन करतात. मात्र यावर्षी पैनगंगा हिवाळ्यातच कोरडी पडल्याने सिंचन करणेही शक्य होणार नाही.