शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हाती

By admin | Updated: April 9, 2015 00:01 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे.

दिग्रस : तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हातात सापडली आहे. यातून रुग्णांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन अशा बोगस डॉक्टरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामीण जनतेतून होत आहे.ग्रामीण भागातील गोरगरीब व अशिक्षित रुग्णांना घरपोच आरोग्य सेवा देण्याकडे काही बोगस डॉक्टरांचा कल दिसून येतो. गावातील काही प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींचाही अशा डॉक्टरांना पाठिंबा आहे. आधी प्रतिष्ठितांचा विश्वास संपादन करून नंतर मात्र आपली दुकानदारी चालविण्यावर या डॉक्टरांचा भर आहे. एखाद्याने या बाबत विरोध केल्यास त्याच गावातील इतर लोकांकडून अशा व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची योजनाही बोगस डॉक्टरांची असते. त्यामुळे कुणी विरोध करण्यास सहजासहजी पुढे येत नाही. तालुक्यातील नागरिकांना उपचारासाठी दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात यावे लागते. अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. हा खर्च प्रत्येकालाच शक्य होत नसल्याने स्थानिक पातळीवरील डॉक्टरांकडून उपचार घेण्यावर नागरिक भर देतात. परंतु हे डॉक्टर किती खरे व किती खोटे याची माहिती कुणालाही नसते. परिस्थितीनुसारच डॉक्टर रुग्णांवर उपचार करून पैसे कमवितात. ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण हे अशिक्षित असतात. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी एखादे इंजेक्शन लावले, गोळ्या दिले की अशा रुग्णांचे मानसिक समाधान होते. यातून बऱ्याचदा अनेकांचा आजारही दूर होतो. अशाच मानसिकतेचा बोगस डॉक्टर लाभ उचलतात. अनेकांनी तालुक्यात विविध ठिकाणी आपले दवाखाने थाटले असून त्याद्वारे ते रुग्णांवर उपचार करतात. अशा डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)