शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित

By admin | Updated: November 8, 2014 22:44 IST

शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लोहारा येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर ८ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले.

यवतमाळ : शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लोहारा येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर ८ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. एक विरुद्ध पंधरा अशा बहुमताने हा प्रस्ताव पारित झाल्याने उपसरपंचाला पायउतार व्हावे लागले. लोहारा येथील उपसरपंच फिरोज खान मजिद खान पठाण यांच्या विरोधात तहसीलदार अनुप खांडे यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव सात सदस्यांनी दाखल केला. मनकर्णा जाधव यांच्यासह सात जणांनी हा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयातच मतदान घेण्यात आले. यामध्ये केवळ एक मत अविश्वास प्रस्तावाविरोधात पडले. तर एक सदस्य या सभेला गैरहजर होता. सरपंचासह उर्वरित १५ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. यावेळी तहसीलदार अनुप खांडे, ग्रामसेवक प्रशांत कांडलकर उपस्थित होते. ठराव पारित झाल्याने फिरोज खान पठाण यांना तत्काळ पदावरून पायउतार व्हावे लागले. आता उपसरपंचपदी कुणाची वर्णी लागते, याची उत्सुकता लागली आहे. अद्याप उपसरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित नसला तरी त्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडी सुरू आहे. लोहारा ग्रामपंचायतीत शहरालगत असल्याने स्थानिक दिग्गज नेत्यांचा येथील घडामोडींमध्ये सातत्याने सहभाग असतो. या ग्रामपंचायतीतील मोठा गट आपल्या बाजूने कसा राहील, आपला प्रभाव या क्षेत्रात कायम राहावा यासाठी नेतेमंडळींचा हस्तक्षेप असतो. त्या दृष्टिकोनातून अविश्वास ठरावाची प्रक्रिया राजकीय पटलावर मोठी खेळी मानली जाते. (कार्यालय प्रतिनिधी)