शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा आगाराला समस्यांनी घेरले

By admin | Updated: January 16, 2016 02:44 IST

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या येथील आगारातील अंधाधुंद,...

सकाळची बस सायंकाळी : निम्म्या बस भंगार, आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष कारणीभूतपांढरकवडा : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या येथील आगारातील अंधाधुंद, भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे ‘बहुजन दुखाय, बहुजन सताय’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. या अंधाधुंद व भोंगळ कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय त्रस्त प्रवाशांनी घेतला आहे.एस.टी.महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, आगार व्यवस्थापकांचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे या आगारातून बरेचदा वेळेवर बस सुटत नाही. सकाळची गाडी सायंकाळी सुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहे. वेळेचे कोणतेही महत्त्व या आगाराला नाही. काही बसच्या फेऱ्यासुद्धा अचानक रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची अतिशय कुचंबणा होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता बसफेरी अचानक रद्द होत असल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागते. त्याचा लाभ अवैध प्रवासी वाहत्तुकदार घेत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकदार आपल्या काळी-पिवळी, टेंपो ट्रॅक्स वाहनांमध्ये प्रवाशांना बसवून जीवघेणी वाहतूक करतात. पांढरकवडा आगारात एकूण ६३ बस आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा जादा बस आता भंगार झालेल्या आहेत. ११९ चालक व ११३ वाहक या आगारात कार्यरत आहेत. कित्येकवर्षापासून सुरू असलेल्या या जुनाट बस अद्याप तशाच धावत आहेत. या आगारातून दररोज एकूण १२५ फेऱ्या होतात. परंतु बहुतांश बस वेळेवर लागतच नाही. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. यातील अनेक टायमिंग वेळेवर रद्द होतात. जेव्हा लहर आली, तेव्हा या बस सोडल्या जात असल्याचे विचित्र दृश्य या आगारात पाहावयास मिळत आहे. मानव विकास मिशनच्या सात बस येथील आगारात आहे. बाहेरगावच्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्या-येण्यासाठी शासनाने या बस उपलब्ध करून दिल्या आहे. मात्र या बस बरेचदा प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जातात. प्रवाशांसाठी असलेल्या बस अनेकदा शाळेच्या विद्यार्थिनींसाठी वापरल्या जातात. त्यामुळे प्रवासी या बसमध्ये घेतले जात नाही. प्रवासी का घेत नाही, म्हणून प्रवाशांचे बरेचदा चालक व वाहकांसोबत वाद होतात. त्यात चालक वाहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)