शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शनिवारी फुलसावंगीत कडकडीत बंद पाळण्यात आला, तर धनोडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फुलसावंगी येथील समाजबांधवांनी बंदची हाक दिली होती. ...
पिंपळगाव (रुईकर) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु निर्मिती आणि विक्री केली जात आहे. कळंब पोलिसांना माहिती देऊनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे शनिवारी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. ...
राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या नावाखाली बांधकाम मजुरांची आर्थिक लूट होत आहे. गावखेड्यात पोहोचून निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यासाठी सुटाबुटातले टोळके सज्ज झाले आहे. ...
शहराच्या विस्तारानंतर सात ग्रामपंचायतींचा नगपरिषदेत समावेश झाला आहे. या सातही ग्रामपंचायत कार्यालयांना नगरपरिषदेने विभागीय कार्यालयाचा दर्जा दिला. मात्र, दोन वर्षे लोटूनही या विभागीय कार्यालयांची नगरपरिषद मुख्य कार्यालयाशी नाळ जुळलेली नाही. ...
शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी जिल्ह्यात तब्बल ९ कोटी २० लाख ३७ हजार रुपयांचा निधी आला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे सर्वाधिकार मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे आहेत. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांवर अद्ययावत पद्धतीने उपचार करता यावे यासाठी कॅलिफोर्नियातील स्टँड फोर्ड युनिव्हर्सिटीच्या तांत्रिक मदतीने एनआयसीयू (नवजात शिशू अतिदक्षता कक्ष) तयार केले जात आहे. ...