येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर १४९ शेतकऱ्यांच्या नावाने दोन हजार ६०२ क्विंटल तुरीची अवैध विक्री करण्यात आली. यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
केळापूर येथील प्रसिद्ध श्री जगदंबा मातेच्या मंदिराला पुणे येथील राज इन्फोटेकचे संचालक जगदीश कदम यांनी देवीच्या मुकूटासाठी एक किलो सोन्याची देणगी दिली आहे. ...
१३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीची तालुक्यात प्रचंड दहशत असतानाच वन कर्मचाऱ्यांना आता उमरीनजीकच्या किन्हाळा व घोडदरा परिसरात वाघ आढळून आल्यामुळे तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
वाढीव पदावर नियुक्त झाल्यानंतरही विनावेतन काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने नुकताच आदेश पारित केला असून अन्यायग्रस्तांना तब्बल १४ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ...
नागपूर राज्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या मुरुम, गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने यवतमाळ ते आर्णी मार्गाची चाळणी झाली आहे. या वाहतुकीने रस्त्याची ऐसीतैसी झाल्याने वाहनधारक संतापले आहे. ...
आर्णी येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद नेर शहरात उमटले. येथील जैन नवयुवक संघ व सर्वपक्षीयांच्यावतीने मोटरसायकल निषेध रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका स्त्रीरोग विभागाला बसला असून येथील चक्क एक युनिट बंद करावे लागले. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता ‘रेफर’ करण्याची नामुष्की ओढवली आहे. ...
पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याला पर्यटन विकासासाठी शासनाने २४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा यासाठी पुढाकार असल्याचे सांगितले जाते. ...