यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, 9 जणांना केले रुग्णालयात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:53 PM2018-10-20T21:53:38+5:302018-10-20T21:56:38+5:30

घाटंजी तालुक्यातील रोहटेक येथील काही बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

food poisoning in Yavatmal, 9 students hospitalise | यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, 9 जणांना केले रुग्णालयात केले दाखल

यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, 9 जणांना केले रुग्णालयात केले दाखल

Next

 यवतमाळ  - घाटंजी तालुक्यातील रोहटेक येथील काही बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रोहटेक येथे शनिवारी एका सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरिकांसोबत अनेक मुले महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी गेले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर काही बालकांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे पालकांची घाबरगुंडी उडाली. जवळपास नऊ बालकांना तातडीने यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केल्याने सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान रोहटेक गावातील आणखी काही बालकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याने त्यांनाही यवतमाळ येथे आणले जाणार असल्याची माहिती आहे. वृत्तलिहिस्तोवर नऊ बालके रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Web Title: food poisoning in Yavatmal, 9 students hospitalise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.